लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील पाणी वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्याचे साठे करावे लागत आहेत.शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. नवीन योजना अजूनही कार्यान्वित झालेली नाही. परिणामी शहरवासियांना १५ ते १७ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे राहटी बंधाऱ्यात मूबलक पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. या सर्व बाबींमुळे शहरवासियांना पाण्यासाठी १५-१५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपाने पाणी वितरणाचे नियोजन करुन आठ दिवसांआड पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.
परभणीत पंधरा दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:07 AM