शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

परभणी : राहाटी बंधाऱ्यातून पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:46 PM

येथील राहटी बंधाºयाला बसविण्यात आलेल्या नवीन प्लेटमधूनही हजारो लिटर पाण्याची गळती होत असून, ही गळती थांबविण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ‘जे हुक’ बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे़ दरम्यान, गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा १० टक्के असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे असले तरी दुष्काळी परिस्थितीत वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील राहटी बंधाºयाला बसविण्यात आलेल्या नवीन प्लेटमधूनही हजारो लिटर पाण्याची गळती होत असून, ही गळती थांबविण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ‘जे हुक’ बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे़ दरम्यान, गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा १० टक्के असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे असले तरी दुष्काळी परिस्थितीत वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे़परभणी शहरवासियांना वसमत रस्त्यावरील राहटी येथील बंधाºयातून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो़ हा बंधारा महानगरपालिकेच्या अखत्यारित असला तरी बंधाºयाची दुरुस्ती आणि देखभालीचे काम वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाकडे आहे़ या बंधाºयाच्या प्लेट जुन्या झाल्याने दोन आठवड्यापूर्वीच बंधाºयाच्या चौदा गेटला नवीन प्लेट बसविण्यात आल्या़ त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी सिद्धेश्वर प्रकल्पातून १़५२७ दलघमी पाणी बंधाºयामध्ये साठविण्यात आले़ परभणी शहराला साधारणत: दीड महिना पुरेल एवढे पाणी बंधाºयामध्ये सध्या उपलब्ध आहे़ मात्र नव्यानेच बसविण्यात आलेल्या या प्लेटमधून पाण्याची गळती होत आहे़ सर्वच्या सर्व गेटच्या प्लेटमधून पाण्याला गळती लागली आहे़ दररोज साधारणत: ३० हजार लिटर पाणी बंधाºयातून वाहून जात आहे़ पाण्याची ही गळती मोठ्या प्रमाणात नसली तरी सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाला ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़ जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही़ आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ उपलब्ध पाणी पुढील वर्षातील जुलै महिन्यापर्यंत काटकसरीने वापरावे लागणार आहे़ अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना पाण्याची थोडीही गळती टंचाईमध्ये भर पाडणारी ठरवू शकते़ २ नोव्हेंबर रोजी बंधाºयाला नवीन प्लेट बसविण्यात आल्या़ ३ नोव्हेंबर रोजी बंधाºयात पाणी दाखल झाले़ पाण्याच्या दाबामुळे २ प्लेटमधील फटीतून ही गळती होत आहे़ थोड्या थोड्या गळतीतून सुमारे २० ते ३० हजार लिटर पाणी दररोज बंधाºयातून बाहेर पडत आहे़ त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़एका गेटला ३२ हुक बसविणारराहटी येथील बंधाºयाला १४ गेट असून, एका गेटमध्ये ४ लोखंडी प्लेट बसविण्यात आल्या आहेत़ प्रत्येक प्लेटला ४ जे हुक बसविले जाणार आहेत़ अशा पद्धतीने एका गेटला ३२ हुक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ या संपूर्ण बंधाºयाला ३५२ प्लेट असून, सर्वच्या सर्व प्लेट नव्याने बसविण्यात आल्या आहेत़ बंधाºयातील पाण्याची चोरी करण्यासाठी अनेक वेळा प्लेट ढिल्या करणे किंवा प्लेट काढून घेण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते़ जे हुक बसविल्यानंतर या प्रकारालाही आळा बसणार आहे़प्रत्येक पाळीला आठ दलघमी पाण्याची आवश्यकतापरभणी शहराला पाणी टंचाई भासू नये, यासाठी जुलै महिन्यापर्यंतचे पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ जुलै महिन्यापर्यंत शहरासाठी ८ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु, सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने यावर्षी सिद्धेश्वर आणि येलदरी अशा दोन प्रकल्पांमध्ये पाणी आरक्षित केले आहे़ राहटी येथील बंधारा दीड दलघमी पाणी साठवण क्षमतेचा आहे़ एकूण ६ पाणी पाळ्यांमध्ये शहरासाठी ८ दलघमी पाणी मिळणार आहे़ सिद्धेश्वर प्रकल्पातून ४ वेळा आणि निम्न दूधना प्रकल्पातून दोन वेळा पाणी घ्यावे लागणार आहे़४ एक वेळा दीड दलघमी पाणी घेण्यासाठी प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडावे लागते़ त्यामुळे परभणी शहरासाठी दोन्ही प्रकल्पांमध्ये प्रत्यक्षात लागणाºया पाण्यापेक्षा किती तरी पटीने अधिक पाणी आरक्षित करावे लागले आहे़दोन दिवसांपासून कामाला सुरुवात४राहटी बंधाºयाला नवीन प्लेट बसविल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे प्लेटमधून पाणी गळती होत असल्याने पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपासून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे काम सुरू केले आहे़ या बंधाºयाला १४ गेट असून, या गेटवर बसविलेल्या प्लेटच्या समोर लोखंडी अँगल बसवून जे हुकच्या सहाय्याने ही गळती कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ काही गेटमधून पाण्याची होणारी गळती मोठी आहे़ साधारणत: पाच ते सहा दिवस हे काम चालणार आहे़ बंधाºयाच्या गेटमधून गळती होत असल्याने जे हुक बसवितानाही कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ अशाही परिस्थितीत बंधाºयाच्या पलीकडील बाजुने हुक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी