लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी या चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून रब्बीची पिके व जनावरांच्या चाºयासाठी एक पाणीपाळी सोडण्याची मागणी दबावगट व शेतकºयांनी केली होती. सेलू येथे रास्तारोकोही केला होता. त्यानंतर मुंबई येथे पाटबंधारे विभागाच्या बैठकीत कालव्यात २६ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु, जालना जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी पाणी सोडण्यास विरोध केल्याने नियोजित वेळेत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे संताप व्यक्त करीत सेलू तालुक्यातील शेतकरी व दबावगटाने कालव्यात पाणी सोडण्याबाबत सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.अखेर शुक्रवारी दुपारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर दुपारी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी पाणी सोडताना अॅड.श्रीकांत वाईकर, अॅड. तुळशीराम चव्हाण, जयसिंग शेळके, दत्तराव आंधळे, सतीश काकडे, विठ्ठल काळे, प्रकाश चव्हाळ, मुकूंद टेकाळे आदींची उपस्थिती होती.८ ते १० दलघमी लागेल पाणीनिम्न दुधना प्रकल्पाचा डावा कालवा ७० कि.मी. तर उजवा कालवा ४० कि.मी. आहे. दोन्ही कालव्याच्या लाभधारक शेतकºयाच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी ८ ते १० दलघमी एवढे पाणी लागणार आहे. यामुळे कालवा लाभक्षेत्रातील हजारो शेतकºयांना या पाण्याचा लाभ होणार आहे.मुंबईतील बैठकीनंतर सोडले पाणीपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठक मुंबई येथे २६ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी पाणी सोडण्यात आले. निम्न दुधनाच्या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तर आ.डॉ.राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतरच या बैठकीचे आयोजन केले होते.
परभणी : ‘दुधना’च्या दोन्ही कालव्यात सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:28 AM