शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परभणी : २९ लाखांतून पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:39 AM

ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़जिल्ह्यात दरवर्षी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते़ संबंधित गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ ज्या गावांमध्ये पाण्याचा कुठलाही स्त्रोत उपलब्ध नाही, अशा ठिकाणी टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो़; परंतु, ज्या गावांमध्ये पाणी उपलब्ध होवू शकते, अशा ठिकाणी सुरुवातीला विहीर, बोअर अधिग्रहण करून टंचाई निवारणाचा प्रयत्न केला जातो़ तर बहुतांश वेळा पाणीपुरवठा योजनेची तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर त्या गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत होवू शकतो़ या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़या अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील गौळवाडी तांडा या गावासाठी ५२ हजार रुपये, बडवणी या गावासाठी ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांच्या कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे़ परभणी तालुक्यामध्ये १० गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ त्यामध्ये हनुमान तांडा येथे ९७ हजार ९००, आळंद ८७ हजार ३००, गव्हा १ लाख १९ हजार २००, पिंपळगाव १ लाख ८९ हजार ७००, किन्होळा १ लाख ९७ हजार ८००, अमदापूर १ लाख ८७ हजार ६००, इठलापूर ७३ हजार ५००, नरसापूर २ लाख १० हजार ५५०, गोविंदपूर २ लाख ७९ हजार २०० आणि मांगणगाव येथे नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ३० हजार ५० रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे़ वरील सर्व गावांमध्ये पाण्याचीटंचाई निर्माण झाल्याने नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केलेल्या रकमेतून तातडीने कामे हाती घ्यावीत आणि गावांना टंचाईपासून मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे़कामांना गती द्या४ग्रामीण भागामध्ये टंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक प्रस्तावही दाखल होत आहेत़ या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास विलंब लागतो़४त्यामुळे निधी मंजूर होवूनही संबंधित गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ तेव्हा एखाद्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधितांनी तातडीने काम हाती घेऊन गावांतील पाणीटंचाई दूर करावी, अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे करावीत, अशी मागणी होत आहे़चुडाव्यात ५ लाखांचे कामटंचाई निवारणासाठी तात्पुरती पुरक नळ योजना घेण्याची मुभा आहे़ या अंतर्गत चुडावा गावातून प्रस्ताव दाखल झाला असून, जिल्हाधिकाºयांनी ५ लाख ७ हजार २०० रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ तात्पुरत्या पुरक नळ योजनेत अंतर्गत जलवाहिनी वाढविली जाते़ तसेच जलस्त्रोतापर्यंतची जलवाहिनी दुरुस्त करण्यात येते़ चुडावा येथील पाणी पुरवठा योजनेच्या जलस्त्रोताला पाणी उपलब्ध आहे़ योजनेची दुरुस्ती केल्यास गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो़ या उद्देशाने तात्पुरत्या पुरक नळ योजनेच्या कामाला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आह़ेप्रलंबित प्रस्ताव निकाली काढाटंचाई नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींमधून दाखल झालेले विहीर अधिग्रहण, टँकरचे अनेक प्रस्ताव पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत़ त्यामुळे गावकºयांना प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर होवून टंचाई निवारणाची आशा लागलेली असते़ दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या स्थानिक स्तरावरच पूर्ण करून हे प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई