लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): सिद्धेश्वर जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी २० फेब्रुवारी रोजी पहाटे पूर्णा येथील गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाºयात पोहोचले. या पाण्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पाणीटंचाईचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे.मागील पंधरा दिवसांपासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. पालिका प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करण्यात आली होती. सोमवारी पहाटे सिद्धेश्वर जलाशयातून २४०० क्युसेस वेगाने ०.५ दलघमी पाणी सोडण्यात आले. ४८ तासांचा प्रवास करीत हे पाणी बुधवारी सकाळी पूर्णा येथील कोल्हापुरी बंधाºयात दाखल झाले. या पाण्यामुळे पूर्णा शहराचा दीड महिन्यासाठी पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.पूर्णा नगरपालिका प्रशासनाकडून आठवड्यातून एकदा पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.नळाला तोट्या बसविण्याची गरज४शहरातील काही भागात पालिका प्रशासनाकडून अतिरिक्त नळ योजनेद्वारे पाणीपुुरवठा केला जातो. या नळांना तोट्या अथवा व्हॉल्व्ह नसल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होतो. काही ठिकाणी घरगुती नळांनाही तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. नळांना तोट्या बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
परभणी : ‘सिद्धेश्वर’चे पाणी पोहोचले कोल्हापुरी बंधाऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:06 AM