लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण पाणीटंचाई अंतर्गत नळ योजनेची विशेष दुरुस्ती आणि तात्पुरती पुरक नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत १३ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण भागात नळ योजनांची दुरुस्ती केली जात आहे. या अंतर्गत सेलू तालुक्यातील कुंडी, सातगावे डासाळा, मानवत तालुक्यातील आंबेगाव व टाकळी निलवर्ण, पालम तालुक्यातील बरबडी व शिरपूर, जिंतूर तालुक्यातील जांब खु., सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव, परभणी तालुक्यातील हनुमान तांडा आणि पूर्णा तालुक्यातील बाणेगाव येथील कामे पूर्ण झाली आहेत. त्याच प्रमाणे तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत पूर्णा तालुक्यात चुडावा व कंठेश्वर आणि सोनपेठ तालुक्यातील देवीनगर तांडा येथील कामे पूर्ण झाली असून या तेराही गावांमध्ये पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई उपाययोजनांसाठी ७८ लाख ९१ हजार रुपये खर्च झाला असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर १ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये खर्च होणे अपेक्षित आहे, अशी माहितीही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली.
परभणी : कामे पूर्ण झालेल्या १३ गावांमध्ये पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:27 PM