शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

परभणी: ६० हजार ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:08 AM

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, २६ एप्रिलअखेर ५९ हजार ६७५ ग्रामस्थांना ४४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, २६ एप्रिलअखेर ५९ हजार ६७५ ग्रामस्थांना ४४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़यावर्षी जिल्ह्यात टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ भूजल पातळी १२ मीटरने खोल गेली असून, प्रकल्पांमध्येही पाणीसाठी शिल्लक नाही़ परिणामी ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता वाढली आहे़ शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना प्रकल्पातील पाणी राखीव ठेवले असल्याने थोड्याफार प्रमाणात नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र अशा प्रकारचे नियोजन नसल्याने हा भाग टंचाईने होरपळत आहे़ सद्यस्थितीला ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत़ नळाला पाणी येत नाही़ गावातील विहिरी, बोअर आटले आहेत़ परिणामी गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ काही भागात शेत शिवारातून पाणी उपलब्ध केले जात असले तरी प्रत्येक गावात पाणी मिळणे शक्य नाही़ परिणामी प्रशासनाने टँकर सुरू केले आहे़सद्यस्थितीला पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, सेलू आणि जिंतूर या सहा तालुक्यांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़पालम तालुक्यात २२ हजार ८४० ग्रामस्थांना १६ टँकरच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ पूर्णा तालुक्यातील पाच गावांमध्ये ९ हजार ७०७ ग्रामस्थांना ८ टँकरच्या सहाय्याने, गंगाखेड तालुक्यातील ३ गावांतील ३ हजार ४१७ ग्रामस्थांना ३ टँकरच्या सहाय्याने, सोनपेठ तालुक्यातील २ गावांमधील ६ हजार ६०० ग्रामस्थांना २ टँकर, सेलू तालुक्यातील ६ गावांमधील ७ हजार ८३६ ग्रामस्थांना ६ टँकरच्या सहाय्याने आणि जिंतूर तालुक्यातील ८ गावांमधील ९ हजार २७५ ग्रामस्थांना ९ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ पालम तालुक्यात सर्वाधिक १६ टँकर सुरू आहेत़ त्यातील १४ टँकर खाजगी आहेत़ त्या खालोखाल जिंतूर तालुक्यात ९, पूर्णा ८ आणि सेलू तालुक्यात ६ टँकर सुरू आहेत़ एकूण ४४ टॅँकरपैकी ३८ खाजगी टँकर सुरू असून, सहा शासकीय टँकर आहेत़ विशेष म्हणजे मागील वर्षी सुमारे ४२ टँकर्स सुरू केले होते़ यावर्षी ४४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ आगामी काळात टँकरची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़नळयोजनांची दुरुस्तीची कामे४ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने काही भागात नळ योजना दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, त्या माध्यमातूनही ग्रामीण भागाला पाणी टंचाईपासून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उर्वरित रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.अडीच हजार : फेºया मंजूर४टंचाईग्रस्त गावांत सुरू केलेल्या टँकरने एकूण २ हजार ५८९ फेºया कराव्याच्या आहेत़ त्यापैकी प्रत्यक्षात २ हजार ३३४ फेºया आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत़ २५५ फेºया बाकी आहेत़४ पालम तालुक्यात टँकरने ६६५ फेºया पूर्ण केल्या आहेत़ पूर्णा तालुक्यात ५०३, गंगाखेड तालुक्यात १६८, सोनपेठ १०२, सेलू २९४ आणि जिंतूर तालुक्यात ६०२ फेºया पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी देण्यात आले आहे़२१५ विहिरींचे अधिग्रहणटंचाईग्रस्त गावांत टँकर्सबरोबरच अधिग्रहणाच्या सहाय्यानेही पाण्याची सुविधा करण्यात आली आहे़ ज्या गाव परिसरात विहिरीला पाणी उपलब्ध आहे़ ती विहीर अधिग्रहण करून गावाला पाणी दिले जात आहे़प्रशासनाने आतापर्यंत २१५ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ५८ विहिरींचे अधिग्रहण झाले असून, परभणी तालुक्यात ८, पालम ३९, पूर्णा २४, सोनपेठ १५, सेलू १९, पाथरी ४, जिंतूर ३८ आणि मानवत तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़अधिग्रहण केलेल्या विहिरींपैकी ३३ विहिरींचे पाणी टँकरसाठी राखून ठेवले आह़े तर १८२ विहिरींचे पाणी प्रत्यक्ष ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले जात आहे़ त्यामुळे अधिग्रहणाच्या माध्यमातूनही ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत आहे.या गावांमध्ये टँकर सुरू४पालम तालुका- चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामपूर तांडा, पेंडू खु़, सादलापूर, पेंडू बु़, बंदरवाडी, पेठशिवणी, पेठ पिंपळगाव, सातेगाव़४पूर्णा तालुका : पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, आहेरवाडी, गोविंदपूऱ४गंगाखेड तालुका : गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, खंडाळी़४सोनपेठ तालुका : नरवाडी, कोथाळा़४सेलू तालुका : तळतुंबा, वालूर, पिंप्री गौंडगे, नागठाणा, कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड़४जिंतूर तालुका : मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा, वडी, घागरा, भोसी़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई