लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे़ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना या नवीन योजनांसह त्यापूर्वी भारत निर्माण, सुजल योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे़ विविध गावांमध्ये योजनांची निर्मिती झाली असली तरी अनेक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत़ किरकोळ तांत्रिक बिघाडांमुळे योजना बंद राहते़ तर काही योजनांची छोटी मोठी कामे शिल्लक असल्याने त्या गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो़ यावर्षी जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस झाला नसल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे़ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर होत आहे़ परिणामी पाणी पुरवठा योजना बंद पडते़ जिल्ह्यातील किती योजना कार्यान्वित आणि किती बंद आहेत? याची माहिती मिळविली तेव्हा मंजूर असलेल्या एकूण योजनांपैकी तब्बल ३० टक्के योजना बंद असल्याची माहिती समोर आली आहे़ पाणी पुरवठा योजनांवर लाखो रुपयांचा खर्च करून ३० टक्के योजना जर बंद राहत असतील तर निश्चितच टंचाईमध्ये भर पडणार आहे़ नैसर्गिक पाणीटंचाईला कृत्रिम टंचाईची जोड मिळत असल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो़ राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ५०१ पाणीपुरवठा योजना पूर्णत: कार्यान्वित झाल्या असून, त्यापैकी ४८५ योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आल्या;परंतु, प्रत्यक्षात ७९ योजना सद्यस्थितीला बंद आहेत़ त्यामुळे योजनेचे काम पूर्ण होवूनही ग्रामीण भाग टंचाईच्या विळख्यात सापडला आहे़ लाखो रुपयांचा खर्च करूनही ग्रामपंचायतींना पाण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत आहे़ जिल्ह्यात एकूण ८०४ गावे असून, त्यापैकी ७०४ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे; परंतु, प्रत्यक्षात १८५ योजनांचा पाणीपुरवठाच बंद असल्याने टंचाईमध्ये भर पडली आहे़ भौतिकदृष्ट्या पूर्ण परंतु, आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या १३५ योजनांपैकी ६५ योजनांचा पाणीपुरवठा ठप्प आहे़ तर कामे प्रगतीपथावर असलेल्या ६८ योजनांपैकी ४१ योजनांच्या माध्यमातून अजूनही पाणीपुरवठा सुरू झाला नाही़ त्यामुळे प्रत्यक्षात कार्यान्वित असलेल्या योजनांच्या तुलनेत पाणीपुरवठा बंद असलेल्या योजनांची संख्या लक्षणीस असल्याने अनेक गावांना कृत्रिम टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे़२३ नव्या योजनांना मंजुरीमुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये २३ नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे़ त्यापैकी २० योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत़ तर एका योजनेचे अंदाजपत्रक अद्याप तयार नाही आणि एका योजनेचे प्रकरण न्यायालयात असल्याने दोन योजना अद्यापही सुरू झाल्या नाहीत़ चारठाणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे़ सद्यस्थितीत मंजूर असलेल्या २३ योजनांपैकी १५ योजनेची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत़ सात ठिकाणी विहिरींची कामे सुरू असून, त्यातील तीन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ एका योजनेचे पम्पींग मशनरीचे काम सुरू आहे तर एका योजनेचे जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून प्राप्त झाली़विविध कारणांमुळे योजना पडल्या बंदराज्य शासनाच्या नियमानुसार एखाद्या गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर किमान १५ वर्षे त्या ठिकाणी दुसरी योजना मंजूर होत नाही़ त्यामुळे मंजूर झालेल्या योजनेतून गावाला पाणीपुरवठा होणे क्रमप्राप्त आहे़ जिल्हा परिषदेंतर्गत बंद असलेल्या १८५ पाणीपुरवठा योजनांची विविध कारणे समोर येत आहेत़ त्यात छोटी मोठी कामे रखडणे, उद्भव विहिरींची कामे अपूर्ण असणे, जलस्त्रोतात पाणीसाठा शिल्लक नसणे, वीज बिलाची थकबाकी अशा अनेक कारणांमुळे या योजना बंद असून, या सर्व योजना तांत्रिकदृष्ट्या सुरू केल्या तर अनेक गावांना पाणीपुरवठा होवू शकतो़गंगाखेड तालुक्यात : बंद योजना अधिकजिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत गंगाखेड तालुक्यामध्ये बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांची संख्या सर्वाधिक आहे़ या तालुक्यात एकूण १११ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत़ त्यात भौतिक आणि आर्थिक दृष्टीकोणातून परिपूर्ण असतानाही २४ पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत़ तर आर्थिकबाबी अपूर्ण असल्याने १७ योजना बंद असल्याची माहिती मिळाली़ जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये पाणीपुरवठा योजनांची संख्याही अधिक आहे आणि बंद योजनांची संख्याही अधिक आहे़ या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे़आगामी वर्षासाठी ८५ योजनाराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी एकूण ८५ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे़ त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात १६, परभणी ९, मानवत ५, सोनपेठ ८, पूर्णा ७, पाथरी ६, जिंतूर १७ आणि सेलू तालुक्यामध्ये १३ गावांत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे़या योजनांचा आराखडा तयार करणे आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्वे करण्याच्या कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ या ८५ योजना सुरू झाल्यानंतर बºयाच अंशी पाण्याचा प्रश्न निकाली निघेल़
परभणी : पावणे दोनशे पाणीपुरवठा योजना ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:23 AM