लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जुना पेडगाव रोडवरील बालाजी नगरातील राहिवाशांना मागील २० दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी १७ जून रोजी पाण्याचे टँकर आडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला.शहरातील वार्ड क्रमांक ११ ब मधील रहिवाशांना महानगरपालिकेचा नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र २० दिवसांपासून अचानक या रहिवाशांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. रहिवाशांनी याबाबत नगरसेवकांना विचारणा केली असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर जलकुंभावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाण्या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे संतप्त झालेल्या बालाजीनगरवासियांनी १७ जून रोजी पाण्याचे टँकर आडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर मनपा आयुक्त रमेश पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनपा प्रशासनाचेही सातत्याने दुर्लक्षच४परभणी शहरातील बालाजी नगर येथील रहिवाशांना गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. या भागातील रहिवाशांनी नगरसेवक व जलकुंभावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली.४पाणी सोडण्याबाबत कोणतेही समाधानरकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. एका-एका नगरात २० दिवस पाणीपुरवठा होत नसतानाही महानगरपालिका प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन बघ्याची भूमिका घेत आहे.४त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याकडे लक्ष देऊन बालाजी नगरातील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून होत आहे.
परभणी : बालाजीनगरवासियांनी अडविले पाण्याचे टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:50 PM