लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ५ मार्च रोजी दुपारी ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता़ तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारत प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले़पाथरी तालुक्यातील शेतकºयांना खरीप २०१९ मधील पीक विमा मंजूर करावा, बोगस पीक कापणी प्रयोग रद्द करावेत, सर्व गावांचे दुष्काळी अनुदान त्वरित वाटप करावे आदी १५ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़गुरुवारी दुपारी विजय कोल्हे, नवनाथ कोल्हे, श्रीनिवास वाकणकर, संतोष हरकळ, बडे साहेब, बालासाहेब हरकळ, ज्ञानेश्वर काळे, किशन महिपाल या शेतकºयांनी बंधाºयाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले़ यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता़तहसीलदार यु़एऩ कागणे यांनी घटनास्थळी दाखल होवून निवेदन स्वीकारले़ त्यानंतर काही शेतकºयांना तहसील कार्यालयात बोलावून चर्चा केली़ मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे लेखी आश्वासन दिले़पाथरीत ११ रोजी बैठक४शेतकºयांच्या मागण्यांसंदर्भात ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाथरीत उपजिल्हाधिकारी व्ही़एऩ कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकाºयांची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली़जिल्हाधिकारी यांच्या समवेत शेतकºयांच्या प्रश्नांवर बैठक घ्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे़ त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़-यु़एऩ कागणे, तहसीलदार
परभणी : ढालेगाव येथील बंधाऱ्यात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 11:20 PM