लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): येलदरी धरणाच्या पायथ्याला एका ओसाड जागेवर पडून असलेल्या अजगराने अख्खी शेळी गिळल्याची बाब सर्पमित्रांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाली़ सर्पमित्रांनी मृत अवस्थेतील शेळीला बाजूला करून या अजगरास जंगलात सुरक्षित सोडून दिले़ हा प्रकार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २़३० च्या सुमारास घडला़येलदरी धरणाच्या पायथ्याला सावंगी म्हाळसा गावाजवळील मोठ्या मातीच्या भिंतीजवळ एक अजगर पडल्याची माहिती शेळ्या चारणाऱ्या मुलांनी गावात दिली़ त्यानंतर या अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती़ तेव्हा शेळीच्या एका पिलास अजगराने अक्षरश: गिळले होते़ ग्रामस्थांनी सर्पमित्र तथा वन विभागाचे अधिकारी गणेश कुºहा यांना माहिती दिल्यानंतर कुºहा हे घटनास्थळी दाखल झाले़ तब्बल एक तासाहून अधिक काळ या अजगराच्या तावडीतून शेळीला सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ त्यानंतर अजगरास पकडून जंगलात सोडून देण्यात आले़यावर्षी येलदरी धरण १०० टक्के भरले असून, जलाशयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल वाढले आहे़ त्यामुळे साप, अजगर यासह अनेक विषारी प्राणी या भागात आढळत आहेत़ गुरुवारी सर्पमित्र गणेश कुºहा यांनी हा अजगर पकडून जंगलात सोडल्याने शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़
परभणी : अजगराने गिळली अख्खी शेळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:15 AM