शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

परभणी : कृषीच्या पंचनाम्यावरच मिळणार पीक विमा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:34 AM

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी, महसूल विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने एकत्रित केले आहेत. नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादरही केला आहे. मनुष्य बळाच्या अभावामुळे कृषी विभागाच्या पंचनाम्यावरच अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी, महसूल विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने एकत्रित केले आहेत. नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादरही केला आहे. मनुष्य बळाच्या अभावामुळे कृषी विभागाच्या पंचनाम्यावरच अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे.मागील चार वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील शेतकºयांच्या पाठीमागे नैसर्गिक संकटांचा ससेमिरा सुरुच आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी करण्यात आली. मागील चार वर्षापासून निसर्ग साथ देत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेकडे वळले. गेल्या चार वर्षात ५ लाखांच्या वरच शेतकºयांनी या योजनेत सहभाग घेतला; परंतु, जेव्हा शासकीय विमा कंपनी होती, तेव्हाच नुकसानग्रस्त शेतकºयांना परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच ४५६ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करुन भरभरुन मदत केली. त्यानंतर खाजगी विमा कंपन्यांनी मात्र निकष, अटी याकडे दुर्लक्ष करीत शेतकºयांकडून विमा हप्ता भरुन घेण्याचे काम केले. मदत देताना मात्र आखडता हात घेतला. यावर्षीच्या खरीप हंगामात जून, जुलै या दोन महिन्यात कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्याला नेमून दिलेल्या अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे पीक विमा भरण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील ८ लाख २१ हजार शेतकºयांनी तब्बल ३५ कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला. विमा कंपनीने आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या पीक कापणी प्रयोगात समाधानकारक पिकांची स्थिती होती; परंतु, आॅक्टोबर महिन्याच्या मध्यांतरापर्यंत यावर्षीच्या खरीप हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल व चार वर्षाचा दुष्काळ पुसून निघेल, अशी स्थिती होती; परंतु, आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया सोयाबीन व कापूस या दोन पिकांना मोठा फटका बसला. शेतकºयांच्या हातून निसर्गाने खरीप हंगामातील पिके हिरावून घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु केले. यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या नेमणुका केल्या. या पथकाने शेतकरी राजा संकटात असल्याने प्रत्येकाच्या बांधावर जावून नुकसानीचा पंचनामा केला. जिल्हा प्रशासनाचे पथक पंचनामा करीत असताना विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी या पथकात दिसले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना याहीवर्षी विम्याच्या रक्कमेपासून वंचित रहावे लागते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु, जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केलेल्या पंचनाम्यावरच विम्याची नुकसान भरपाई देण्यात येईल, असे सांगितले. जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान झाले आहे. त्यामुळे या कंपनीकडे ८ लाख २१ हजार शेतकºयांनी भरलेल्या विम्याची रक्कम बहुतांश शेतकºयांना मिळणार आहे.साडेचार लाख हेक्टरवरील : पिकांचे जिल्ह्यात नुकसान४जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४ लाख ५६ हजार ९३३ हेक्टरवरील जिरायती, बागायती, फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३१२ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. त्याची २५ टक्के रक्कम ही जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे अ‍ॅग्रीकल्चर इशुरन्स कंपनीनेही जिल्हा प्रशासनाने केलेला पंचनामा गृहित धरुन तात्काळ शेतकºयांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.तीनशे कोटी रुपयांचा विमा मिळणे अपेक्षित४परभणी जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी झाली. हंगामाच्या सुरुवातीस पावसाच्या बेभरोस्यामुळे जिल्ह्यातील ८ लाख २१ हजार शेतकºयांनी अ‍ॅग्रीकल्चर इशुरन्स कंपनीकडे वेगवेगळ्या पिकांचा विमा उतरविला आहे. या विम्यापोटी ३५ कोटी रुपयांचा विमा हप्ताही विमा कंपनीकडे जमा केला आहे.४आता राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांच्या हिस्स्याची रक्कम मिळून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी जवळपास ३०० कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम जिल्ह्याला मिळणे अपेक्षित आहे. यावर जिल्हा प्रशासन व विमा कंपनीने तातडीने पाऊले उचलत शेतकºयांना तात्काळ विमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीGovernmentसरकार