शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

परभणी : कोल्हापूरचा पहेलवान संतोष दोरवड ठरला विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:42 AM

प्रा़अशोकराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने येथे आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील मल्ल संतोष दोरवड याने सोलापूरचा मल्ल समाधान पाटील याला चित करून राज्यस्तरावरील खुल्या गटात परभणी चषक किताबाचा मान मिळविला़ विजेत्या संतोष दोरवड याला १ लाख ५१ हजार रुपये रोख, बुलेट मोटारसायकल, एक किलो चांदीची गदा आणि परभणी चषकाचा किताब मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी (परभणी): प्रा़अशोकराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने येथे आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील मल्ल संतोष दोरवड याने सोलापूरचा मल्ल समाधान पाटील याला चित करून राज्यस्तरावरील खुल्या गटात परभणी चषक किताबाचा मान मिळविला़ विजेत्या संतोष दोरवड याला १ लाख ५१ हजार रुपये रोख, बुलेट मोटारसायकल, एक किलो चांदीची गदा आणि परभणी चषकाचा किताब मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़प्रा़अशोक देशमुख फाऊंडेशनचे रविराज देशमुख यांच्या पुढाकारातून येथील रावसाहेब जामकर विद्यालयाच्या मैदानावर रविवारी निकाली कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या़ या स्पर्धेत राज्यस्तरावरील उपविजेता ठरलेला हौसापूर (जि़सोलापूर) येथील राजे छत्रपती तालीमचा मल्ल समाधान पाटील यास रोख १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले़ मराठवाडा चषक किताबाचा मानकरी जालन्याचा पहेलवान विलास डोईफोडे हा ठरला़ अंतीम लढतीत विलास डोईफोडे याने लातूर येथील पहेलवान भारत कºहाड याच्यावर मात करीत हा किताब पटकावला़ त्यास होंडा युनिकॉन मोटारसायकल, गदा आणि महाराष्ट्र चषक किताब प्रदान करण्यात आला़ उपविजेत्या मल्लास ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले़ रात्री ११ वाजेपर्यंत स्पर्धा चालल्या़ स्पर्धेत राज्यातील ३०० मल्लांनी सहभाग नोंदविला़ प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभला़ आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली प्रेक्षक गॅलरीही अपुरी पडल्याने इमारतीवरून आणि गाड्यांवर उभे राहून रसिकांनी स्पर्धेचा आनंद लुटला़ शंकरआण्णा पुजारी यांनी धावणे समालोचन केले़ शंकर पाटील यांनी डोक्यावर नारळ फोडण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविले.या स्पर्धेमध्ये ५७ किलो वजन गटात पहेलवान दयानंद सलगर (अंबाजोगाई), ६१ किलो बालाजी बुरगे (खवसपूर जि़ सोलापूर), ६५ किलो अक्षय गिराम (सोलापूर), ७० किलो बापू भरत जरे (पुणे), ७४ किलो दिशेन मोकाशे (पुणे), ७९ किलो अशिष वावरे (सोलापूर), ८६ किलो अमोल मुंडे (पाटोदा), खुला गट : मराठवाडास्तर पहेलवान विलास डोईफोडे (जालना), खुला गट राज्यस्तर पहेलवान संतोष दोरवड (शाहूपुरी तालीम कोल्हापूर) या मल्लांनी विजेतेपद पटकावले़स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन जाधव, राजू मगर, आकाश लहाने, रामा देशमुख, केदार जाधव, संदेश संघई, गितेश देशमुख, सिद्धार्थ जंगले, सखाराम कुरूंदकर, श्यामराव देवकर, प्रदीप भंडे, राजेश्वर देशमुख, प्रवीण शिंदे, श्याम निर्वळ, संजय पाटील, सुधीर शिंदे, कैलास देवकर, शंकर स्वामी, संतोष सामाले, हनुमान कदम, काशीनाथ भालेराव, संजय पाटील, तालीम संघाचे सचिव तथा स्पर्धा संयोजक प्रा़ डॉ़ माधव शेजूळ, प्रा़ डॉ़ अभिजीत कंडेरे, प्रा़ भालचंद्र पवार यांनी प्रयत्न केले़

टॅग्स :parabhaniपरभणी