लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): नवीन नळ जोडणी घेण्याच्या कारणावरुन नगरसेवकाच्या भावजयीस चाकूचे वार करुन मारहाण झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील रमाबाई नगरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.रमाबाई नगर परिसरातील शालूबाई आवचार व चंद्रकलाबाई हाके हे रस्ता फोडून नवीन नळ जोडणी घेत होते.यावेळी नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांनी तुमच्याकडे पहिलाच नळ आहे. दुसरा नळ घेऊ नका, असे सांगितले. त्यावर शालूबाई व चंद्रकलाबाई यांनी आम्ही त्याच नळाला जोडणी देत आहोत, असे म्हटले. त्यानंतर नगरसेवक खंदारे येथून निघून गेले असता शालूबाई व चंद्रकलाबाई यांनी दोन्ही नळांचे कनेक्शन घरात घेतले.२१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रमाबाई नगरातील शेख इस्माईल यांच्या घराजवळ गर्दी झाल्याने नगरसेवक चंद्रकांत खंदारे व त्यांच्या भावजयी रेखा रवि खंदारे त्या ठिकाणी गेले.तेव्हा राजकुमार बापुराव आवचार, त्यांची पत्नी शालूबाई आवचार, चंद्रकलाबाई व सासरा अंकुश हे घरातून पळत आले, राजकुमार आवचार यांनी रेखा खंदारे यांना थापडबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या नगरसेवक खंदारे यांनाही चौघांनी धक्काबुक्की केली. तसेच राजकुमार अवचार याने चाकूने रेखा खंदारे यांच्या डाव्या हातावर मारुन जखमी केले, अशी तक्रार रेखा खंदारे यांनी रविवारी रात्री दिल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी : नळ जोडणीच्या वादात महिलेवर चाकूचे वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:22 PM