लोकमत न्यूज नेटवर्कपिंगळी (परभणी): माकडाने चावा घेतल्याने महिला गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंगळी येथे घडली आहे़गावातील रंजना नागनाथ खाकरे या अंगणात थांबल्या असताना अचानक माकडाने त्यांच्यावर हल्ला केला व रंजना खाकरे (५०) यांना जोराचा चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत़ घटनेनंतर खाकरे यांना तातडीने पिंगळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले़ मात्र जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे़त्यांना जवळपास २५ ते ३० टाके पडले असल्याची माहिती देण्यात आली़ माकडाच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ विशेष म्हणजे यापूर्वी देखील माकडाने चार ते पाच जणांना चावा घेतला आहे़ वन विभागाने या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़माकडांचा वाढला उपद्व्याप४पिंगळी येथे मागील काही दिवसांपासून जवळपास ५० ते ६० माकडे गावात फिरत आहेत़ सध्या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेत शिवारात पाणी उपलब्ध नसल्याने ही माकडे पाण्याच्या शोधात गावात दाखल झाली असून, माकडांच्या उपद्व्यापामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत़ हनुमान, राम मंदिर परिसरात या माकडांचे वास्तव्य असून, या पूर्वी अनेकांना माकडांनी चावा घेतला आहे़
परभणी : माकडाच्या चाव्याने महिला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:04 AM