लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी संपात सहभाग नोंदवित कामबंद आंदोलन केले़ त्यामुळे अनेक शासकीय आणि खाजगी कार्यालयांमधील कामकाज सलग दुसºया दिवशी ठप्प झाले होते़कामगारांच्या मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता़ बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयटक प्रणित विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी शनिवार बाजार येथून मोर्चा काढला़ नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी कामगार नेत्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणावर कडाकडून हल्ला चढविला़ मेस्मा कायद्याच्या धमक्यांना कामगार चळवळ दबणार नाही़, असा इशारा देत भाजप सरकार सामाजिक तणाव निर्माण करून जातीय दंगे घडविण्याचे मनसुबे रचत असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी आपल्या भाषणात केला़हमाल माथाडी कामगारांना कायदेशीर अधिकारापासून वंचित ठेवणारा प्रस्ताव रद्द करावा, भविष्य निर्वाह निधी, किमान वेतनापासून हिरावून घेणारे प्रस्ताव रद्द करावेत, रोजंदारी कामगारांना कायम करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़या आंदोलनात मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (लाल बावटा), एआयबीईए, वर्कर्स फेडरेशन, नगरपालिका युनियन, अंगणवाडी कर्मचारी युनियन, रोजगार सेवक संघटना, आशा कर्मचारी युनियन, शालेय पोषण आहार संघटनांनी सहभाग नोंदविला़ कॉ़ राजन क्षीरसागर, शेख अब्दुल, माधुरी क्षीरसागर, मुगाजी बुरुड, बाबू खान, शेख मुनीफ, सय्यद अजहर, सीमा देशमुख, अर्चना कुलकर्णी, संगीता जाधव, लक्ष्मण राठोड, किशोर गायकवाड आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनपरभणी- येथील जिंतूररोडवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी पोषण आहार कामगारांनी आंदोलन करुन देशव्यापी संपात सहभाग नोंदविला. केंद्र शासनाने आठरा वर्षांपूर्वी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीत कामगार हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर या कामगारांना काम करावे लागत आहे. तेव्हा मानधनात वाढ करावी, किचन पद्धत बंद करावी, विनाकारण कामगारांना कामावरुन काढू नये, कल्याणकारी महामंडळ योजनेत या कामगारांचा समावेश करावा आदी मागण्या करीत आंदोलन करण्यात आले. लाल बावटा प्रणित शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाई किर्तीकुमार बुरांडे, पंढरीनाथ मुळे, इंद्रजीत आहेर, ज्ञानोबा जवंजाळ, रामराव पंढरे, हरिभाऊ देश्मुख, गजानन चोपडे, सुदाम भरोसे, लक्ष्मी कच्छवे, उत्तमराव मानकरी, सदाशिव मस्के, रंजना कच्छवे आदींसह कामगार सहभागी झाले होते.
परभणी : कामगारांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:41 AM