लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व महत्त्वांच्या कक्षांची स्वच्छता करण्यात आली. सर्व कक्ष निर्जुंतुकीकरण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.जिल्ह्यात कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व विभाग आणि प्रमुख अधिकाऱ्यांचे कक्ष, नागरिकांना थांबण्यासाठी असलेल्या कक्षांची सोमवारी स्वच्छता करण्यात आली. निर्जंतुकीकर द्रव्याचा वापर करीत ही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या सूचनेवरुन सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी या संदर्भातील आदेश काढला. त्यानुसार ही स्वच्छता करण्यात आली. या कार्यालयातील जिल्हा परिषद पदाधिकाºयांचे कक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा कक्ष, कर्मचाºयांसाठीचा कक्ष तसेच सर्व विभागांची स्वच्छता करण्यात आली आहे.पाचशे मास्कचे वाटप४कोरोना या आजारापासून अधिकारी- कर्मचाºयांचा बचाव व्हावा, यासाठी सोमवारी जि.प.च्या अधिकारी- कर्मचाºयांना पाचशे मास्कचे वितरण करण्यात आले. तसेच सॅनिटायझरही उपलब्ध करुन देण्यात आले. राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेतही कर्मचाºयांची उपस्थिती ५ टक्क्यांवर आली आहे. जेवढे कर्मचारी उपस्थित होते. त्या सर्वांना मास्क आणि सॅनिटायझर वितरित केल्याची माहिती मंजुषा कापसे यांनी दिली.४दरम्यान, कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी काम करीत आहेत. ग्रामीण भागातही हा प्र्नादूर्भाव होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात असून जि.प.तील आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी गाव पातळीवर सर्व्हेक्षण व उपचार करीत आहेत.
परभणी जि.प. कार्यालयाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:55 PM