शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

परभणीत आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:39 AM

येथील जिंतूररोडवरील वुडस् या फर्निचरच्या दुकानास आग लागल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिंतूररोडवरील वुडस् या फर्निचरच्या दुकानास आग लागल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली.शहरातील जिंतूररोड परिसरात वुडस् हे फर्निचरचे दुकान असून या दुकानाच्या शेजारीच बालरुग्णालय आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास फर्निचरच्या दुकानातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. बघता बघता आग वाढत गेली. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. तोपर्यंत टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे गौरव देशमुख, डी.डी. कानोडे, सचिन जाधव, मदन जाधव, शंकर कुटे, संतोष राठोड, वाहनचालक इनायत, मौलाना, वसीम आदींनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. आग वाढत असाल्याने येथील बाजार समितीच्या अग्नीशमन दलास पाचारण केले. तसेच जिंतूर, पाथरी, मानवत, पूर्णा आदी ठिकाणाहून अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या. सलग पाच तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आग अटोक्यात आली. या आगीमध्ये दुकानाशेजारीच असलेली आॅईल विक्रीची दोन दुकानेही जळून खाक झाली.रुग्णांना हलविल्याने टळला अनर्थवुडस् या फर्निचरच्या शेजारीच बालरुग्णालय आणि प्रसुतीगृह आहे. आगीची घटना लक्षात येताच समयसूचकता राखत या रुग्णालयातील रुग्णांना सामान्य रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परभणी शहरातील विविध खाजगी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. काही रुग्णांना आॅटोतून तर काहींना रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णांमध्ये महिला आणि बालरुग्णांचा समावेश होता. रुग्णवाहिका चालक संतोष ठमके, प्रताप ठमके, शेख खाजा, बंडू लांबरे, गणेश खिल्लारे, अनिल ठमके आदी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनीही तातडीने मदतकार्य सुरु केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णालयातील काही भागाचेही आगीने नुकसान झाल्याची माहिती मिळाली..भोगावजवळ पेटला वणवा४जिंतूर- तालुक्यातील भोगाव जवळील जंगलामध्ये वणवा पेटल्याने अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली. आगीमुळे वन्य प्राणीही सैरवैर झाले होते.४भोगावपासूनच जवळच असलेल्या इटोली रस्त्यावर हा वणवा पेटला. साधारणत: १० ते १२ एकर जमीन या वणव्याखाली आली आहे. या जमिनीवर सागवान, पळस, लिंब यासह इतर अनेक झाडे होती. वणवा पेटल्याने या वनातील मोर, ससे, हरण, रोही, निलगाय आदी प्राणी सैरवैर धावताना दिसून आले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वणवा पेटला त्याच्या बाजुलाच बंधारा असल्याने अनेक प्राण्यांचा या भागात वावर होता. मोरांची व अनेक प्राण्यांची घरटेही वणव्याच्या भक्षस्थानी पडली.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस