...तर नंबरसाठी होतो लिलाव
जिल्ह्यातील दुचाकी तसेच चारचाकी वाहनांबाबत फॅन्सी नंबर घेण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ असते. एकच नंबर एकापेक्षा अधिक जणांना हवा असल्यास त्या फॅन्सी नंबरसाठी लिलाव प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये १०१०, ०००७, ०३५८, १००८, ८०५५, ४१४१ या विशेष नंबरसाठी लिलाव प्रक्रिया घेतली जाते. यात जो वाहनधारक जास्तीतजास्त रक्कम लिलावात देण्यास तयार होईल, त्याला हा नंबर दिला जातो. लिलाव करण्याचे प्रकार अनेकदा येथील कार्यालयामध्ये घडले आहेत.
या नंबरला सर्वाधिक पसंती
८०५५
०००९
४१४१
०००७
या नंबरचा रेट सर्वात जास्त
०००९ - १ लाख ५० हजार
००७७ - ५० हजार रुपये
आरटीओची कमाई
२०१८ ६१ लाख ५४ हजार ५००
२०१९ ५३ लाख ५३ हजार ५००
२०२० ४६ लाख २७ हजार
२०२१ जूनपर्यंत ७ लाख ४७ हजार ५००
कोरोनाकाळातही हौसेला मोल नाही
मागील दीड वर्षात कोरोना तसेच लाॅकडाऊन असले, तरी अनेकांनी असे नंबर घेण्याला पसंती दिली आहे. यामध्ये मागील दीड वर्षात ५३ लाख ५४ हजार एवढा महसूल उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परभणी कार्यालयाला मिळाला आहे.
चॉइस नंबरसाठी करा ऑनलाइन नोंदणी
वाहनधारकांनी वाहन खरेदी केल्यावर त्यांना चॉइस नंबर हवा असल्यास त्यांना आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही. त्यांना यासाठी ऑनलाइन वाहन परिवहनच्या वेबसाइटवर फॅन्सी पर्यायात जाऊन आवडता नंबर पाहून त्याची उपलब्धता असेल, तर केवळ कार्यालयात त्याची अधिकृत फीस भरायची आहे. यानंतर वाहन पासिंग केलेल्या ठिकाणी हा नंबर त्यांना दिला जातो. कार्यालयात जाऊन चौकशी करण्याची गरज आता राहिलेली नाही.
जिल्ह्यातील अनेक वाहनधारक फॅन्सी नंबर घेण्यास इच्छुक असतात. त्यांना पाहिजे तो नंबर मिळण्यासाठी ते शुल्कही भरतात. यामध्ये ९ बेरीज असलेले क्रमांक घेण्यासाठी तसेच ८०५५, ७१७१ हे नंबरसुद्धा जास्त प्रमाणात मागितले जातात.
- श्रीकृष्ण नकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी