परभणीच्या भाविकांच्या बसचा मध्य प्रदेशात अपघात; एकाच कुटुंबातील १४ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:30 PM2019-02-22T12:30:11+5:302019-02-22T12:32:32+5:30
अपघातातील जखमी एकाच कुटुंबातील आहेत
परभणी : मध्य प्रदेशातील सागर शहराजवळ काशी यात्रेला जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात गुरुवारी (दि. २१ ) रात्री झाला. यात एकाच कुटुंबातील १४ जण जखमी झाले असून यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शाखा व्यवस्थापक रामप्रसाद लोभाजी गरुड (रा. पिंगळी ) हे आपल्या बहिणी आणि काही नातेवाईकांसोबत परभणी येथून 18 फेब्रुवारी रोजी काशी यात्रेला मिनी ट्रॅव्हल्सने निघाले होते. १० दिवसांच्या या यात्रेत गरुड कुटुंब आणि नातेवाईक अशा 14 जणांचा सहभाग होता. प्रवासा दरम्यान, 21 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशमधील सागर शहराजवळ रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स व ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. यात ट्रॅव्हल्समधील सर्व भाविक जखमी झाले. जखमींवरवर जवळच असलेल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींची नावे अशी :
1. रामप्रसाद लोभाजी गरुड, वय 52 रा पिंगळी ता परभणी
2. शिवकण्या रामप्रसाद गरुड, वय 47 रा पिंगळी
3. दत्तात्रय लिंबाजी पवार, वय 60 रा परभणी
4. सगरबाई लिंबाजी पवार, वय 70 रा परभणी
5. सरुबाई बालासाहेब पवार, वय 70 रा वझुर ता पूर्णा
6. शांताबाई ज्ञानोबा यादव, वय 60 रा रामपूरी बु ता मानवत
7. कांताबाई ओमप्रकाश पवार, वय 50 रा असेगाव ता जिंतूर
8. उत्तमराव कदम, वय 55 रा पूर्णा
9. शोभा उत्तमराव पवार, वय 45 रा पूर्णा
10. गोदावरी बालासाहेब कदम, वय 65 रा वसमत
11. राजेभाऊ गरुड (चालक, रा पिंगळी )