शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

परभणीचा वीज पुरवठा दिवसभर खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:18 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील विजेची कामे करण्याच्या उद्देशाने शहरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील विजेची कामे करण्याच्या उद्देशाने शहरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्यात येत आहेत़ मुख्यमंत्री फडणवीस यांचे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्या ठिकाणच्या वीज दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, मुख्यमंत्र्यांच्या दौºयात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेश महावितरणने दिल्याने बुधवारी दिवसभर शहरामध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कामे केली़ यासाठी शहराचा वीज पुरवठा सकाळी १० वाजेपासूनच खंडित करण्यात आला़ जिंतूर रोड, वसमत रोड या प्रमुख मार्गावर कामे करण्यात आली़ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्याचे कामही बुधवारी करण्यात आले़ या कामांमुळे दिवसभर शहरातील वीज पुरवठा खंडित होता़ मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे़ दमट वातावरणामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यातच वीज पुरवठा खंडित ठेवल्याने नागरिकांची उकाड्याने घालमेल झाली़ सायंकाळी साधारणत: ४ वाजेच्या सुमारास काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला़असे आहेत वीज कर्मचाºयांना दिलेले आदेश४मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांनी १३ आॅगस्ट रोजी कार्यकारी अभियंत्यांना पत्र काढून सुचना दिल्या आहेत़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री भेट देणार असून, आपल्या कार्यक्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी ते भेट देणार आहेत, त्या ठिकाणची उच्चदाब वाहिनी, लघुदाब वाहिनी व वितरण रोहित्रांची देखभाल दुरुस्ती करणे, वाकलेले, तुटलेले वीज खांब सरळ करणे, ढिल्या तारांना ताण देणे, वितरण पेटी व रोहित्रांची देखभाल दुरुस्ती करणे, या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे आदी कामे तातडीने करून त्याचा अहवाल पाठवावा, अशा सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार शहरासह दुरुस्तीची कामे सुरू होती़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण