लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कठुआ व उन्नाव येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेप्रमाणी पुकारलेल्या शहर बंद दरम्यान ६ बसवर दगडफेक करुन दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.एमएच.२०/बीएल ११२५ या बसवर दगडफेक करुन काचा फोडल्याने बसचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच एम.एच.२०/डी ३१३२, एम.एच. २०/बीएल ४०५६, एम.एच. २०/बीएल ३५०२ या तीन बसवर १० ते १५ जणांनी दगडफेक करुन ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. एम.एच.२०/बीएल ११०४ या बसवर झालेल्या दगडफेकीत १५ ते २० हजार रुपयांचे आणि एमएच २०/बीएल १२७० या बसवर झालेल्या दगडफेकीत बसचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
परभणीत दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:40 AM