पाथरी - घरासमोर कार पार्किंग केल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती या प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाजोगाई येथून 10 सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन पाथरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले
पाथरी शहरातील अजीज मोहल्ला भागात 8 सप्टेंबर मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास घरासमोर गाडी पार्क करण्याच्या कारणावरून शिवीगाळकरून बाचाबाची झाली. त्यानंतर मोहमद बिन सईद बिन किलेब चाऊस यांनी आपल्या कमरेची रिव्हाल्व्हर काढून सलाम बिन सालेम बिन हवेल यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने परिसरात दहशत पसरली होती. या प्रकरणी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर रागसुद्धा, सहायक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त , आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी आरोपीच्या घराची आणि मिलची झाडाझडती घेतली. परभणीरोडवरील मीलमध्ये टेबलच्या कप्प्यात दोन धारदार लोखंडी खंजीर आढळून आले.
यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पथकातील सहायल पोलीस निरीक्षक शरद विपट, सुगीरव केंद्रे, निलेश भुजबळ जमीर फारोकी,शंकर गायकवाड ,कांबळे यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी अंबाजोगाई येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने थेट अंबाजोगाई गाठून एका धाब्यावरुन आरोपीस ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी पाथरी पोलीस ठाण्यात हजर केले.