पाथरी निवडणूक निकाल: कॉंग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांचा एकहाती विजय; भाजपला शिवसेनेची नाराजगी भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 02:17 PM2019-10-24T14:17:52+5:302019-10-24T14:21:16+5:30
Pathari Vidhan Sabha Election Results 2019: Mohan Fad vs Suresh Warpudkar महायुतीमध्ये शिवसेनेच्या तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला हा मतदार संघात महायुती आणि भाजपने आलटी-पलटी केली.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पाथरी विधानसभा मतदार संघात भाजप आणि काँग्रेस अशी लढत झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. महायुतीमध्ये शिवसेनेच्या तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला हा मतदार संघात महायुती आणि भाजपने आलटी-पलटी केली. महायुतीच्या वतीने भाजपाचे आ़ मोहन फड आणि आघाडीच्या वतीने काँग्रेसचे सुरेश वरपूडकर निवडणूक रिंगणात उतरले होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत वरपूडकर हे १४ हजार ७३८ मतांनी विजयी झाले आहेत.
कोणास किती मते :
सुरेश वरपूडकर -१ लाख ५ हजार २९७ ( काँग्रेस )
मोहन फड -९० हजार ५५९ ( भाजपा )
विलास बाबर -२१ हजार ७०२ ( वंचित )
डॉ. जगदीश शिंदे -८ हजार ५२० ( अपक्ष )
भाजपचे आ़ मोहन फड यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघात विकास कामे केली़ आरोग्य सेवेचेही मोठे योगदान दिले़ होते. मात्र त्यांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या नाराजगीचा फटका बसला. दुसरीकडे सुरेश वरपूडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने तगडी प्रचार यंत्रणा उभारली आणि विजय खेचून आणला. यासोबतच शेतकऱ्यांचिं सुप्त नाराजगीसुद्धा भाजपाच्या विरोधात गेली आणि याचा वरपूडकर यांना फायदा झाला. सुरुवातील सरळ लढत होईल, असे वाटत असतानाच शिवसेनेचे बंडखोर जगदीश शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. वंचितच्या बाबर यांना २१ हजार ७०२ मते मिळाली असून ते तिसऱ्या स्थानी राहिले.