परभणी : जिल्ह्यात मागच्या दोन-अडीच महिन्यांपासून तापाची साथ पसरली असून, आतापर्यंतच्या नोंदीनुसार डेंग्यूचे चारही प्रकारचे रुग्ण नोंद झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तापाची साथ पसरली आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाले असून, लहान, मोठ्या अशा सर्वच वयोगटात रुग्ण आढळत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. मात्र, यावर्षी डेंग्यूसदृश तापाने मागच्या दोन महिन्यांपासून जिल्हावासीय त्रस्त आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे चार प्रकारचे रुग्ण आढळतात. यावर्षी या चारही प्रकाराचे रुग्ण नोंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे.
कोणत्या प्रकारचे आढळले रुग्ण
डेंग्यूचे टाईप १ ते टाईप ४ असे चार प्रकार आहेत. ज्यात तापाची लक्षणे आढळणे, पेशी कमी होणे, रक्तस्राव होणे, रक्तदाब कमी होणे असे प्रकार आढळतात. या सर्व प्रकारचे रुग्ण नोंद झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
ताप नसताना पॉझिटिव्ह
यावर्षी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये काही जणांना तापाची लक्षणे नसतानाही त्यांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वेळा रुग्णांना सौम्य ताप असतो, तो लक्षात येत नाही. अशा वेळी डेंग्यूची तपासणी केल्यास पॉझिटिव्ह येते.
प्लेटलेस् कमी नाही तरीही पॉझिटिव्ह
काही रुग्णांमध्ये प्लेटलेटस् कमी झालेल्या नसतानाही त्यांची डेंग्यूची तपासणी पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे प्लेटलेटस् कमी नसतानाही डेंग्यू असू शकतो.
ऑगस्टपर्यंत झालेल्या एलायझा तपासण्या
७५४
नोंद झालेले रुग्ण
३
सप्टेंबर महिन्यातील तपासण्या
९२
पॉझिटिव्ह
२