उमरगा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी हे काम बंद पाडले़ उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, याचा शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने याची दखल घेवून संबंधित कंपनीला खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या़ संबंधित कंपनीने गुरूवारी शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले होते़ मात्र, महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याऐवजी मोठे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत होते़ त्यातही डांबरमिश्रीतखडी वापरली जात होती़ हा प्रकार पाहून संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हासंघटक अंबादास जाधव यांनी कार्यकर्त्यासह हे काम थांबवून थांबविले़ तसेच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील केवळ मोठेच नाही तर लहानही खड्डे बुजवावेत, चांगले काम करावे, डांबर-खडी दर्जेदार वापरावी, अशी मागणी लावून धरली़ दरम्यान, मागील तीन वेळेसही या कंपनीने खड्डे बुजविण्याचे काम केले असले तरी हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने रस्ता खराब होत आहे़ ‘लोकमत’च्या वृत्तानंतर खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले कामही निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संभाजी ब्रिगेडने हे काम थांबविले आहे़ (वार्ताहर)
खड्डे बुजविण्याचे काम बंद पाडले
By admin | Published: September 30, 2016 1:08 AM