यावेळी ॲड. संजय भांबळे, हेमंतराव आडळकर, दत्तराव मोगल, मनोज थिटे,रामराव उबाळे, संदीप राठोड, चंद्रशेखर मुळावेकर, चंद्रकांत गाडेकर, चक्रधर पौळ, प्रदीप ढवळे, सुधाकर रोकडे, दत्ता तांबे, रामेश्वर गाडेकर, अज्जू कादरी ,मजिद बागवान आदींची उपस्थिती होती. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांची सत्ता होती. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर माजी आ. विजय भांबळे यांनी सेलू बाजार समितीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला. विद्यमान संचालकांना दोषी ठरवत राज्य शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले व प्रशासकाची नियुक्ती केली. मात्र एक महिन्याच्या आत माजी आ. विजय भांबळे यांनी अशासकीय प्रशासक म्हणून आपल्या ६ समर्थकांची वर्णी लावली. तसेच बाजार समितीमध्ये मित्र पक्ष काँग्रेसच्या देखील दोन सदस्यांना आपल्या सोबत सत्तेत सहभागी करुन घेतले. शिवसेनेचे देखील बाजार समितीच्या सत्तेत सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे असतांना माजी आ. विजय भांबळे यांनी स्वत:च्या समर्थकांना सत्तेत सहभागी करुन सेलू बाजार समितीवर आपले वर्चस्व मिळवले आहे.
पावडे यांनी स्वीकारला बाजार समितीचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:11 AM