दरवर्षा उन्हाळ्यात विविध गावांमध्ये तसेच वाडी, तांडे आणि शहरी भागात पाणी टंचाई जाणवत असते. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी खासगी टँकर किरायाणे घेतले जातात. याच दृष्टीकोणातून यावर्षी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने १० ते १२ मे टन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमता असलेले ५० खासगी टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत. यासाठी सक्षम कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी संबधित कंत्राटदाराला २ लाख रुपयांची अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. तसेच ६ लाख रुपयांची सुरक्षा ठेव ठेवावी लागणार आहे. याकरीता२३ फेब्रुवारी ते१७ मार्च या कालावधीत निविदा दाखल करता येणार आहेत. २२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या निविदा उघडण्यात येणार आहेत.
संभाव्य पाणी टंचाई निवारणाचे प्रशासनाकडून नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:26 AM