लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नववर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबर रोजी रात्री दारु पिऊन गोंधळ घालणाºया आणि अवैधरित्या दारु बाळगणाºया ४८ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात ४४ हजार २७५ रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली आहे.३१ डिसेंबर रोजी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. या काळात दारूच्या नशेत गाडी चालवून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच अवैध दारूची विक्रीही वाढते.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली तसेच गस्तही घालण्यात आली.या दरम्यान, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करीत पोलिसांनी ४४ हजार रुपयांची दारू पकडली आहे. परभणी येथील नवामोंढा, कोतवाली, नानलेठ, पालम, पाथरी, सोनपेठ, चारठाणा, जिंतूर, दैठणा, पिंपळदरी, परभणी ग्रामीण, मानवत, चुडावा, सेलू, ताडकळस, बोरी आदी पोलीस ठाण्यांत कारवाई करीत एकूण ४८ गुन्हे नोंदविले. या कारवाईत पोलिसांनी देशी, विदेशी दारूच्या ६०१ बाटल्या जप्त केल्या आहेत.अडीच हजारांची दारु जप्त४गंगाखेड-येथील पोलीस ठाण्याच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी दारु विक्रेत्याविरूद्ध कारवाईची मोहीम राबवून तीन कारवायांमध्ये अडीच हजार रुपयांची दारु जप्त केली़ ३१ डिसेंबर रोजी चोरटी दारु विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन गंगाखेड पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी कारवाईची मोहीम राबविण्यात आली़शहरातील राजू दराडे (रा़ कृष्णानगर) याच्याकडून ६५० रुपये किंमतीच्या १३ देशी दारूच्या बाटल्या, अंकुश चव्हाण (रा़ शिवाजी नगर तांडा) याच्याकडून ९५० रुपयांच्या दारुच्या बाटल्या तर समद जहीरोद्दीन अत्तार (रा़ ममता कॉलनी) याच्याकडून ९०० रुपये किंमतीच्या १८ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या़ या प्रकरणी पोशि राहुल मोरे, वसंत निळे, शेख जिलानी यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आह़े़ शहरात ठिक ठिकाणी देशी-विदेशी दारुची विक्री होत असताना दारूच्या केवळ ५० बाटल्याच पोलिसांच्या हाती लागल्या आहेत़ यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
परभणीत ४८ तळीरामांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:23 AM