शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

मानवतमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; नगरसेवकासह २८ जणांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:59 PM

शहरातील खंडोबा रस्त्यावर असलेल्या अमोल रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा

ठळक मुद्दे एकुण १ लाख ५५  हजार रुपायाचा मुद्देमाल जप्त

मानवत : शहारातील खंडोबा रस्त्यावर एका रेस्टॉरंट मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकुन एका नगरसेवकासह  २८ जणावर कारवाई करीत १ लाख  ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. 

शहरातील खंडोबा रस्त्यावर असलेल्या अमोल रेस्टॉरंटमध्ये पैसे लावुन जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेस्टॉरंटवर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. पोलिसांना येथे झन्नामन्ना नावचा जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी २८ जणावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८० हजाराच्या रोख रक्कमेसह मोबाईल, जुगाराच्या साहित्यासह  एकुण १ लाख ५५  हजार रुपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे स पो नि शिवाजी देवकते यांच्या फिर्यादीवरुन नगरसेवक विनोद राहाटे, जनार्धन किर्तने, दिपक भदर्गे, कैलास शिंदे, दत्ता रोडे, सुनिल पाटेकर, सुधाकर बारहाते, ओमप्रकाश चव्हाण, नवनाथ गुदटवार, शाम कुऱ्हाडे, सुंदर लेंगुळे, चक्रपाणी भक्ते, नितिन चव्हाण, शेख बाबु शेख बिसमिल्ला, आशोक धबडगे, योगेश गायकवाड, भास्कर काळे, अण्णासाहेब बारहाते, युवराज लाड, शेख समीम शेख मेहबुब, शेख मेहमुद शेख मेहबुब, आकाश चव्हाण, बालाजी आळसे, राजु बारहाते, शेख नफिक शेख रफिक, कैलास धबडगे, मनोज चव्हाण, नारायण भोरपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपो नि मुंडे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसraidधाड