शहरातील खानापूर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या आमदार आपल्या दारी उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, तालुकाप्रमुख नंदू पाटील, महिला विधानसभा संघटक अंबिका डहाळे, गटनेते चंदू शिंदे, अनिल डहाळे, सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, नवनीत पाचपोर, विशू डहाळे, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, संभानाथ काळे, मारोती तिथे, राहुल खटिंग, मनोज पवार, प्रा. गजानन काकडे, अजित यादव, बाबू फुलपगार, डॉ. जोगदंड, नंदिनी पानपट्टे, महेश पारवेकर, गणेश मुळे, राहुल कांबळे आदी उपस्थित होते.
आ. डॉ. पाटील म्हणाले, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणानुसार आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन केले आहे. विविध शासकीय कार्यालयातील अनेक महत्वपूर्ण योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. शासकीय योजनांची माहिती मिळाली तरी सामान्य नागरिकांना या योजना मिळण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच सामान्य नागरिकांना वैद्यकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठीदेखील विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. या सर्व अडचणीतून नागरिकांची सुटका व्हावी व सामान्य नागरिकांना शासकीय योजना त्यांच्या दारापर्यंत अगदी कुठलेही शुल्क न भरता मिळवून देण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच परभणी विधानसभा मतदार संघातील संपूर्ण ग्रामीण भागात राबवण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांच्या कामासाठी लागणारे संपूर्ण शुल्क शिवसेनेच्या वतीने भरण्यात येणार असल्याचे आ. डॉ. पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी उद्धव मोहिते, बाळासाहेब गोडबोले, ऋषी सावंत, राजू शिंदे, चक्रधर शिंदे, शशिकांत शिंदे, किरण शिंदे, महेश तांबे, दीपक कनकुटे, अजय खाडे, शिवाजी मोहिते, सिद्धेश्वर शिंदे, शुभम पारवे, संदीप शिंदे, राहुल गायकवाड, निखिल जैन आदींनी प्रयत्न केले.