कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. राहुल पाटील, तर उद्घाटक म्हणून कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांची उपस्थिती होती. तसेच मनपा आयुक्त देविदास पवार, जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रविराज देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महाराष्ट्र कृषी परिषदेचे सदस्य अजय गव्हाणे, विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य लिंबाजी भोसले, शरद हिवाळे, बालाजी देसाई, प्रा. रामभाऊ घाटगे आदींची उपस्थिती होती. येथील कृषी महाविद्यालयाला माजी खासदार प्रा. अशोकराव देशमुख यांचे नाव द्यावे, अशी विनंती अजय गव्हाणे व एम. ए. यु. फायटर्सच्या वतीने करण्यात आली. त्यावर आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले, कृषी महाविद्यालयास माजी खा. प्रा. अशोकराव देशमुख यांचे नाव देण्याविषयी शासन स्तरावर मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, विद्यापीठ स्थापनेपासून विद्यापीठाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. भविष्यातील आव्हाने व जबाबदारी त्यांनी यावेळी विषद केली. विस्तार कार्याच्या माध्यमातून विद्यापीठाने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून सक्षम शेतकरी व कृषी उद्योजक म्हणून उभे करण्याचे काम विद्यापीठ नेहमी करेल, अशी ग्वाही दिली. सतीश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अशोक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश सोनी यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन....
परभणी येथील जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्ट आणि एम. यु. फायटर्स यांच्यावतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करताना कुलगुरू डॉ. अशोक ढवण. समवेत आ. डॉ. राहुल पाटील, मनपा आयुक्त देविदास पवार, रविराज देशमुख, ओमप्रकाश यादव, अजय गव्हाणे, लिंबाजी भोसले, शरद हिवाळे, बालाजी देसाई, प्रा. रामभाऊ घाटगे आदी.