लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कागदपत्र तपासणीच्या नावाखाली उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या आॅटोरिक्षा जप्तीच्या कारवाईच्या विरोधात १९ आॅगस्ट रोजी शहरातील आॅटो चालकांनी आॅटोरिक्षे बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ या आंदोलनात आॅटो चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ शिवाय विविध संघटनांनी आॅटो चालकांच्या मागणीला पाठींबा दर्शविला आहे़परभणी शहर व परिसरात आॅटोरिक्षा चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या नावाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने चार दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे़ आतापर्यंत ५०० आॅटोरिक्षे या कार्यालयाने जप्त केले आहेत़शहरात कुठलीही रोजगाराची सुविधा उपलब्ध नसल्याने बेरोजगार तरुण आॅटोरिक्षाचा व्यवसाय करून उपजीविका भागवितात़ मात्र या कारवाईमुळे आॅटोरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ या कारवाईविरूद्ध संताप व्यक्त करीत सोमवारी आॅटोरिक्षा संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. जप्त केलेले आॅटो परत द्यावेत व ही कारवाई थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ आंदोलनानंतर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़या आंदोलनात किर्तीकुमार बुरांडे, सोमनाथ धोते, राहुल घनसावंत, मनोहर सावंत, बाळासाहेब गायकवाड, सुभाष जावळे, रामेश्वर शिंदे, शिवलिंग बोधणे, गजानन जोगदंड, अनिरुद्ध रणवीर, गजानन घाडगे यांच्यासह आॅटोचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़आॅटोचालकांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठींबा४आॅटोरिक्षा चालकांच्या या प्रश्नांवर शहरातील विविध संघटनांनी पुढाकार घेऊन या आरटीओंच्या कारवाईचा विरोध करीत आॅटोचालकांना पाठींबा दिला आहे़४मायनॉरेटी डेव्हल्पमेंट आॅर्गनायझेशनचे महेबुब खान पठाण, सय्यद रफिक पेडगावकर, शेख उस्मान, असेफ पटेल आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जप्त केलेले आॅटो सोडावेत, अशी मागणी केली़४प्रहार जनशक्ती पक्षाने या प्रश्नी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन आॅटोरिक्षा चालकांवरील कारवाईचा निषेध केला आहे़ जप्त केलेले आॅटो सोडून देण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनावर जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे, पी़टी़ निर्वळ, ओंकार गव्हाणे, शंभू देऊळगावकर, अमोल लांडगे, शेख कलीम आदींची नावे आहेत़
परभणी शहरात आॅटो चालकांचे कारवाईच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:15 AM