अशी झाली कापूस खरेदी
परभणी शहरातील ७ खरेदी केंद्रांवर कापूस विक्री केली जात आहे. यामध्ये ओंकार जिनिंगमध्ये ७०६ शेतकऱ्यांचा २१ हजार ६१८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राजराजेश्वर जिनिंगमध्ये ८१५ शेतकऱ्यांनी २५ हजार ३३३ क्विंटल कापूस विक्री केला आहे. अरिहंत फायबर्सकडे ७५२ शेतकऱ्यांनी २३ हजार ५६३ क्विंटल, परभणी तालुक्यातील झरी येथील व्यंकटेश्वरा जिनिंगकडे ४९६ शेतकऱ्यांनी १५ हजार २२९ क्विंअल् कापूस विक्री केला आहे. बालाजी जिनिंगकडे ४८७ शेतकऱ्यांनी १५ हजार ४८९ क्विंटल, व्यंकटेश परभणी जिनिंगकडे १९७ शेतकऱ्यांनी ६ हजार १८१ क्विंटल, तर संत प्रयाग जिनिंगकडे १०६ शेतकऱ्यांनी २ हजार ९९७ क्विंटल कापूस विक्री केला आहे. या शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
मोबदला अदा करण्यास आखडता हात
परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून योग्य नियोजन करून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र कापूस फेडरेशनकडे तालुक्यातील ३ हजार ५५९ शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ४१४ क्विंटल कापूस विक्री केला आहे. मात्र या सव्वा महिन्याच्या काळात आतापर्यंत एकाही शेतकऱ्याचा कापूस विक्रीचा मोबदला कापूस फेडरशने अदा केला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.