पूर्णा (परभणी ) : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून मुंबई येथे धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनास येथील आडत व्यापाऱ्यांनी पाठींबा दर्शवत एक दिवसाचा बंद पाळला.
शासकीय सेवेत समावेश करावा या सह इतर मागणी साठी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे गुरुवार पासून मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे पूर्णा बाजार समितीचे कामकांज बंद ठेवण्यात आले आहे. या आंदोलनात येथील अडत व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला. यामुळे आज अडत बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट दिसून आला.