येथील साजिद खान सिकंदर खान यांचा ताडबोरगाव शिवारातील शेतात आखाडा असून नेहमीप्रमाणे ते बुधवारी चार बैल आखाड्यावरील दावणीला बांधून घरी आले होते. सकाळी ते शेत आखाड्यावर गेले असता त्यांना दोन बैल सुटल्याचे दिसून आले. तर एक बैल आजूबाजूला शोध घेऊनही आढळून आला नाही. याबाबत त्यांनी त्यांचा ७५ हजार रुपये किमतीचा बैल चोरीला गेल्याची फिर्याद मानवत पोलिसात दिली आहे. ऐन पेरणीच्या दिवसात बैल चोरीला गेल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तर गावातील रत्नाकर राजेभाऊ जोशी यांच्या घराजवळील गोठ्यातून ५० हजार रुपये किमतीच्या दोन गाई चोरीला गेल्या असून याबाबत त्यांनी उशिरापर्यंत फिर्याद दिली नव्हती. आठ दिवसांपूर्वीच परिसरातील यशवाडी शिवारातून एक बैल व एक गाय चोरीला गेल्याची घटना घडली असून त्याचा अद्याप शोध लागला नाही. मागील काही दिवसांपासून परिसरातील पशुधन चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताडबोरगाव येथून सव्वा लाखाचे पशुधन चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:13 AM