यावर्षीच्या खरीप हंगामात बँकांना १६५५ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बॅकानी १ लाख ५६ हजार ५० शेतकऱ्यांना १ हजार ९२ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ६६ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले होते.
त्यानंतर आता रबी हंगाम सुरू झाला असून, यासाठी ४५१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु, बँकांनी पीक कर्ज वाटपाला आखडता हात घेत १५०० शेतकऱ्यांना आतापर्यंत १० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी तरी जिल्हा प्रशासनाने बँकांना दिलेले उद्दिष्ट बँका पूर्ण करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बँकांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक पाऊल पुढे टाकत मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.