- भास्कर लांडेपालम (परभणी) : तालुक्यात पावसाने कहर केला असून शुक्रवारी (ता.८) रात्रभर पाऊस झाला. परिणामी, गळाटी, लेंडी, धोंडसह सर्वच नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने 14 गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला आहे. अद्यापही पावसात खंड पडला नसून ही गावे संपर्कात येण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागेल.
पालम तालुक्यात आठवड्यापासून नियमित पाऊस होत आहे. त्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने आणखीच भर घातली. तो पाऊस तालुक्यात सर्व दूर होता. शनिवारी (ता.९) सकाळी ९ वाजेपर्यंत त्यात खंड पडला नाही. परिणामी, पालम तालुक्यातील गोदावरी वगळता उर्वरित सर्वच नद्याचे पाणी पात्रबाहेर आली आहे. प्रामुख्याने गोदावरीच्या उपनद्या असलेली गळाटी व लेंडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली. लेंडी नदीवरील पुयणी शेजारील पूल शनिवारी पहाटेपासून पाण्याखाली गेला. म्हणून त्यापलीकडील पुयणी, आडगाव, तेलजापूर, खडी, वनभुजवाडी, गणेशवाडी गावांचा संपर्क पालमची तुटला.
दुसरीकडे याच नदीवरील पालम शेजारच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्याचा फटका चार गावांना बसला. त्यात आरखेड, घोडा, सोमेश्वर, फळा, हे गाव संपर्क बाहेर गेली आहेत. शिवाय, सिरपूर ते सायळा दरम्यानच्या गळाटी नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे पुलापलिकडील सायाळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी गावांचा संपर्क पालम शहराची तुटलेला आहे. येथील ग्रामस्थांना संपर्क पूर्ववत होण्यासाठी वाट पाहावी लागेल. कारण पावसात खंड पडलेला नाही. त्यामुळे आजारी रुग्ण, कर्मचारी, दुग्ध व्यवसायिकांसह ग्रामस्थांना पालमला येता आले नाही.
बनवस येथे भिंत पडलीपालम तालुक्यातील बनवस येथील सुशिलाबाई ज्ञानोबा टाळकुटे यांच्या घराची भिंत शनिवारी पहाटे कोसळी कोसळली. सुदैवाने त्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु कपडे, संसार उपयोगी साहित्य, शेतमाल भिजला. पावसाचे पाणी त्यांच्या घरात येत असल्याने नुकसानीत भरत पडत आहे.
पालम तालुक्यात पुरामुळे बंद मार्ग - लेंडी नदीच्या पुरामुळे : पालम ते पूयनी, पालम ते फळा, पालम ते घोडा. - गळाटी नदीच्या पुरामुळे : सिरपूर ते सायळा, नाव्हा ते आडगाव, आरखेड ते सोमेश्वर.- धोंड नदीच्या पुरामुळे : गिरधरवाडी ते बनवस.- बकुळा पुलावरून पाणी वाहत असल्याने : सिरपूर ते केरवाडी.