शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

परभणी जिल्ह्यात पूर्णा, गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:13 AM

जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात चार दिवसांपासून पाऊस सुरु असून सोमवारी पूर्णा व गंगाखेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय रविवारी रात्री सेलू व परिसरात तब्बल २१ मि.मी. पाऊस झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा/ गंगाखेड (परभणी): जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात चार दिवसांपासून पाऊस सुरु असून सोमवारी पूर्णा व गंगाखेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय रविवारी रात्री सेलू व परिसरात तब्बल २१ मि.मी. पाऊस झाला आहे.जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजा अस्वस्थ झाला होता. २१ जून रोजी जिल्ह्यातील विविध भागात सरासरी ६.८१ मि.मी. पाऊस झाला. २२ जून रोजी २.४२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर या दिवशी रात्री सरासरी ६.३३ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सेलू तालुक्यात २१ मि.मी. तर मानवत तालुक्यात १६ आणि पाथरी तालुक्यात ९.३३ मि.मी.पावसाची नोंद झाली. या व्यतिरिक्त परभणी तालुक्यात ५ तर पूर्णा तालुक्यात ५.६० मि.मी.पावसाची सोमवारी सकाळी महसूल विभागाकडे नोंद झाली. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ३.२५ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरात जोरदार पाऊस सुरु झाला. जवळपास १ तास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र काही गावांमध्ये तूरळक स्वरुपाचा पाऊस झाला.पूर्णा तालुक्यातही सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ताडकळस मंडळातील खांबेगाव, महातपुरी, गणपूर तसेच निळा शिवारात दमदार पावसाने हजेरी लावली. तर कात्नेश्वर मंडळात नांदगाव, झिरोफाटा, एरंडेश्वर भागातही चांगला पाऊस झाला. पूर्णा शहर व परिसरातही पावसाने हजेरी लावली. चुडावा, गौर परिसरात मात्र पाऊस झाला नाही. या पावसामुळे जिल्ह्यातील खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होणार आहे.सोनपेठ शहर व परिसरात दुपारी ४.२५ वाजेच्या सुमारास जवळपास २० मिनिटे पाऊस झाला. तालुक्यातील डिघोळ येथेही जवळपास १ तास पाऊस झाला. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. परभणी शहरातही दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.याशिवाय मानवत तालुक्यातील मानोली व परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावली. रामपुरी व परिसरातही २० जून रोजी चांगला पाऊस झाला. खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.पाच घरात पाणी शिरले४गंगाखेड शहरात झालेल्या दमदार पावसानंतर रजा कॉलनी भागात नालीचे पाणी तुंबून पाच ते सहा घरांमध्ये शिरले. यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय शहरातील रस्त्यावर व बसस्थानक परिसरात पाण्याचे डबके साचल्याचे पहावयास मिळाले.४बसस्थानकात गेल्या अनेक वर्षापासून थोडाही पाऊस झाला तरी पाण्याचे डोह साचतात. यामुळे प्रवाशांना कसरत करीत बसमध्ये चढावे लागते. याकडे एस.टी.महामंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.जिल्ह्यात : सरासरी ५ टक्केच पाऊस४यावर्षीच्या पावसाळी हंगामात १ ते २३ जून या काळात वार्षिक सरासरीच्या ५ टक्के पाऊस जिल्ह्यामध्ये झाला आहे. परभणी तालुक्यामध्ये ३.५ टक्के (८६२.६० ), पालम तालुक्यात ५ टक्के (६९७), पूर्णा तालुक्यात ५.३ टक्के (८०४.४०), गंगाखेड ७.५ टक्के (६९७), सोनपेठ ५.१ टक्के (६९७), सेलू ४.८ टक्के (८१६.७०), पाथरी ४.६ टक्के (७६८.५०), जिंतूर ४.१ टक्के (८११.७०) तर मानवत तालुक्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तुुलनेत ७.८ टक्के (८१६.७०) पाऊस झाला आहे. कंसातील आकडे तालुक्याच्या वार्षिक सरारीचे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी