शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:20 PM

मंगळवारी पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाल्याने बागायती पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मंगळवारी पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाल्याने बागायती पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे़दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, सोसाट्याच्या वादळी वाºयासह विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि पाऊस झाल्याने नागरिकांची धांदल उडाली़ सोमवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणामध्ये अचानक बदल होवून जिल्ह्यात वादळी वारे वाहिले़ अनेक भागांत पावसाने हजेरी लावली़ सोमवारी रात्रभर विजांचा कडकडाट सुरू होता़ काही भागांत वीज कोसळून जीवितहानीही झाली आहे़ पाथरी तालुक्यामध्ये सोमवारी वीज कोसळून दोन मेंढपाळांचा मृत्यू झाला होता़ तसेच ३९ शेळ्या दगावल्याची घटना घडली होती़मंगळवारी पहाटेही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ परभणी शहरात पहाटेपासूनच सूर्यदर्शन झाले नाही़ पावसाळी वातावरण तयार होऊन सकाळपासूनच ढगांचा गडगडाट होऊन हलका पाऊस झाला़ तसेच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या़ तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथेही पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे़ तसेच पोखर्णी व परिसरात वादळी वाºयामुळे अनेक झाडे उन्मळून पडली़ आंबा, ज्वारी, लिंबू, केळी इ. पिकांचे नुकसान झाले आहे़पालम तालुक्यातही मंगळवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे परिसरातील पिकांचे नुकसान झाले़ तसेच जिंतूर, गंगाखेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे़ परभणी जिल्ह्यात रबी हंगामातील बहुतांश पिके काढणीला आली आहेत़ ज्वारीची काढणी करून शेतामध्ये कडब्याच्या वळया करून ठेवल्या आहेत़ तर हळद पिकाचीही काढणी सुरू आहे़सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे कडबा भिजून नुकसान झाले़ तसेच वादळी वाºयामुळे कैºया गळून मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले़ ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.परभणीत वीज कोसळली : टाकळीत कडबा जळाला४परभणी- मंगळवारी सकाळी वादळी वाºया दरम्यान शहरातील भीमनगर परिसरातील सुमनताई गव्हाणे शाळेसमोरील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाड जळाल्याची घटना घडली़४तसेच तालुक्यातील टाकळी बोबडे येथे प्रकाश भास्करराव दाभाडे यांच्या शेतात सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने शेतातील ३ हजार ५०० कडब्याच्या पेंढ्या जळून खाक झाल्या़ या प्रकरणी प्रकाश दाभाडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घटनेची माहिती दिली आहे़ उशिरापर्र्यंत पंचनामा झाला नव्हता़खंडाळी येथे पाऊसखंडाळी- गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरात सोमवारी रात्री वादळी वाºयासह हलकासा पाऊस झाला़ मंगळवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, वादळी वाºयामुळे केळी, आंब्याचे नुकसान झाले आहे.सेलू, मानवतमध्ये पाऊस४मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली़ मानवत, सेलू तालुक्यांमध्ये सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ सेलूमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला़ तर मानवतमध्येही हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या़ सेलू तालुक्यातील वालूर आणि परिसरात अर्धा तास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि परिसरातही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला़ अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट व पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले.वीज कोसळून एक जण जखमी४झरी : झरी परिसरात वीज कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़ झरी आणि परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला़ यावेळी झरी येथील नारायण कचरूबा सोनवणे हे ज्वारीची कणसे उचलण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये गेले होते़४याच दरम्यान, पाऊस आल्याने नारायण सोनवणे ट्रॅक्टरमध्येच बसले होते तर इतर मजूर शेतातील कणसे भरण्याचे काम करीत होते़ त्यावेळी अचानक वीज कोसळली़ यात नारायण सोनवणे (३५) हे जखमी झाले़ या घटनेनंतर लगेच परिसरातील मजुरांनी धावपळ करीत मदतकार्य केले़ नारायण सोनवणे यांना तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़४दरम्यान, अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतात काम करणाºया मजुरांची धांदल उडाली़ झरी आणि परिसरातील इतर गावांमध्ये हा पाऊस झाला़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी