कोठे काय झाले
पालम-परभणी रस्त्यावरील बलसा पुलावरून पाणी वाहत असल्याने १४ तास या मार्गावरील वाहतूक बंद.
ताडकळस-सिंगणापूर रस्त्यावरील मजलापूर येथील पूल गेला वाहून.
परभणी-पाथरी रस्त्यावरील किन्होळा येथील कच्चा रस्ता वाहून गेल्याने १४ तास वाहतूक ठप्प.
सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीला पूर आल्याने तालुक्याचा पाच गावांशी १४ तास संपर्क तुटला.
पिंगळगड नदीला पूर आल्याने ताडकळस-पूर्णा रस्ता बंद.
शिर्शी बु. येथे २३३ मेंढ्यांचा मृत्यू.
परभणी तालुक्यातील शिर्शी बु. येथील ओढ्याला पाणी आल्याने या ओढ्याच्या पुराच्या पाण्यात गोविंद वैद्य व आव्हाड या मेंढपाळांच्या २३३ मेंढ्या वाहून गेल्या. या सर्व मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे संबंधितांनी सांगितले.
या महसूल मंडळात झाली अतिवृष्टी
परभणी - १४८.८ मिमी
पेडगाव २३०.५
जांब ८०
झरी ८६.३
सिंगणापूर ११८.८
पिंगळी १३४.५
परभणी ग्रामीण ८९.३
टाकळी कुंभकर्ण ११२
पाथरी ७२
पूर्णा ७२.३
लिमला १०६.३
कात्नेश्वर ८४
चुडावा ८०.५
कावलगाव ८८.५
चाटोरी ६७.८
बनवस ६५
कोल्हा १०३
७८ गावांत नुकसान
जिल्ह्यात रविवारी झालेल्या पावसाने ७८ गावांमध्ये नुकसान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली. यामध्ये ७० गावे परभणी तालुक्यातील तर ७ गावे पूर्णा तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात २७६ जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये २५६ लहान तर २० मोठ्या जनावरांचा समावेश आहे.
५ हजार हेक्टरवरील जमिनीचे नुकसान
रविवारच्या पावसाने जिल्ह्यातील ४ हजार ८९७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ४ हजार ४९७ हेक्टर जिरायती तर ३५० हेक्टर बागायती आणि ५० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.