पाच दिवस पावसाचा स्कायमेटचा अंदाज
हवामानाच अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने परभणी जिल्ह्यात चालू आठवड्यात १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत पाऊस पडण्याचा ंअंदाज वर्तविला आहे. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्रानेही परभणी जिल्ह्यात १६ व १७ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
जिल्ह्यात रविवारी झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)
परभणी १३.९, गंगाखेड २२.२, पाथरी ३२.७, जिंतूर २३.३, पूर्णा ९.३, पालम १०, सेलू १६.२, सोनपेठ ३५.६, मानवत २३.९
पंधरा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पाऊस झाला. हा पाऊस सोयाबीन, कापूस या पिकांसाठी पूरक आहे. असे असले तरी मोठ्या पावसाची पिकांना आवश्यकता आहे.
-विजय लोखंडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी