पालम : पालम तालुक्यात गोदावरी, लेंडी, गळाटीस सर्वच नद्या नाले, ओढ्यांना पूर आलेला आहे. पुरामुळे सहा सप्टेंबर रोजी च्या दुपारपासून तेरा गावांचा संपर्क तुटला. गळाटी नदीपलीकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी तर लेंडी नदीपलीकडील फळा, फरकंडा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी आणि गणेशवाडीचा संपर्क होऊ शकत नाही. दुसरीकडे अनेक गावांत पाणी शिरले आहे. जवळा येथील जिल्हा परिषदेच्या आठ खोल्यांमध्ये पाणी शिरले आहे. येथील अनेक घरांत पाणीच पाणी झाले आहे. चाटोरी ते माळेगाव दरम्यानचा राज्य महामार्ग देखील पुराच्या पाण्यामुळे तीन तास बंद होता. हीच गत तालुक्यातील बहुतांश गावात झाली आहे.
पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही घटना गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्ग 361-एफ वरील केरवाडी गावालगत घडली. सदर बस जेसीबीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्याचे कार्य सुरू होते. राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी गावालगत गळाटी नदीवर पूल आहे. येथील पुलावरून गळाटी नदीचे पाणी वाहत असताना पालमकडून येणाऱ्या बसचालकाला पाण्याचा अंदाज लागला नाही. म्हणून चालकाने पूल पार करण्यासाठी बस पुढे नेली असता पाणी वाढत गेले. त्यामुळे चालकाने बस तिथेच थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. जवळपास 16 प्रवासी या बसमध्ये होते. ते जवळच्या केरवाडी गावात आले. परंतु बस पुराच्या पाण्यातच असून पाणी वाढत आहे. त्यानंतर बसचालकाने केरवाडी गावातून जेसीबी आणून ही बस पाण्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे कार्य सुरू होते.
बनवस येथे १०० घरांत पाणी शिरलेपालम तालुक्यात मागील २४ तासापासून संततधार पाऊस सुरूच असल्याने पावसाने हाहाकार माजविला आहे. पालम गंगाखेड राष्ट्रीय महामार्गसह पालम-ताडकळस राज्य महामार्गही बंद असून तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बनवस येथे १०० घरांत पाणी शिरले असून अनेक गावांमधील घरे पाण्याखाली आहेत. हा पूर १९९८ पेक्षाही मोठा आहे.
पालम-ताडकळ महामार्ग बंद; धानोरा पूल पाण्याखालीगोदावरी नदीला 6 सप्टेंबर रोजीच्या रात्रीपासून पूर आला आहे. पुराचे पाणी वाढत जाऊन 7 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत धानोरा काळे येथील पुलाला भिडले होते. दुपारी तीन वाजता गोदावरीची पाणी पातळी 364. 60 मीटर एवढी होती. म्हणून धानोरा काळे पुलावरून गोदावरी नदीचे पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली. पुलाच्या दोन्ही बाजूने काही वाहने थांबली आहेत. परंतु पाणी लवकर उतरेल, अशी शक्यता नाही. नदीकाठच्या गावांना पालम प्रशासनाने धोक्याचा इशारा दिलेला आहे.
हेही वाचा - - जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव