सेलू (परभणी ) : तालुक्यातील अनेक भागात पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यात या मागणीसाठी चिकलठाणा पाटीवर गुरुवारी (दि.२५ ) सकाळी 11:30 वाजता शेतकऱ्यांनी रास्तारोको केले.
मागील वर्षी तालुक्यात अल्पप्रमाणात पाऊस झाला होता. शासनाने तालुका दुष्काग्रस्त म्हणून जाहीर केला. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. मात्र संबंधित इफको टोकियो या कंपनी ने विमा मंजूर असूनही दिला नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. वालुर व चिकलठाणा पंचनामे करुन दुष्काळ जाहीर करावा, प्रति हेक्टर 35 हजार रुपये मदत करावी, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान द्यावे, मजुरांना काम द्यावे, फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको केले. दिड तास रस्ता अडवल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलिस निरिक्षक संदिपान शेळके यांनी स्वीकारले. आंदोलनात जि. प. सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, प. स. सभापती पुरुषोत्तम पावडे, रामेश्वर गाडेकर, आनंद डोईफोडे, उद्धव बुधवंत, प्रशांत नाईक, चंद्रकांत गाडेकर ,गुलाब गाडेकर, भानुदास रासवे, अशोक खरात, दिलिप टाके, माऊली घुगे, राजेंद्र गाडेकर, सर्जेराव गाडेकर, अमोल गाडेकर, नारायण जाधव, विकास जाधव, महादेव जाधव, रामप्रसाद टाके, विश्वनाथ रासवे, रामेश्वर रासवे, भारत कदम, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.