शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

परभणी जिल्ह्यात २८७ कोटी बँकांना प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:31 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे १६३४ कोटी रुपयांचे पीकर्ज कर्ज घेतले आहे. ही रक्कम पाहता २५ टक्के शेतकºयांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे.दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनी मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीककर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र त्यानंतरच्या वर्षातही शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात दीड लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली़ या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नावही दिले़ कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले होते़ जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रावरून २२ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. शेतकºयांनी दाखल केलेल्या अर्जांची तालुका आणि गावनिहाय यादी करून चावडी वाचनही झाले़ सर्व शेतकºयांची दिवाळी कर्जमाफीच्या माध्यमातून गोड करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते; परंतु, दिवाळीचा सण उलटून जवळपास २ महिन्यांचा कालावधी होत आहे़ मात्र अद्याप सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे दिसत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ज दाखल केलेल्या ३ लाख शेतकºयांपैकी ६५ हजार ३२७ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.जनजागृतीचा अभावकर्जमाफी झाल्याची माहिती लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली, याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.२९ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची २८७ कोटी रुपयांची रक्कम बँकांना मिळाली असली तरी आपले खाते कोरे झाले का? याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.‘आपले सरकार’वरही मिळेना माहितीजिल्ह्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईनच्या माध्यमातून जवळपास २ महिन्यांपूर्वी अर्ज अपलोड केले आहेत. मात्र कर्जमाफी योजनेत शेतकºयांचे नाव आले की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली होती. या योजनेत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट पोर्टलवर टाकण्यात येत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाने या पोर्टलवरील ही माहिती बंद केली आहे. त्यामुळे बँकांना जरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली असली तरी यातील नेमके लाभार्थी शेतकरी कोणते, हे मात्र समजेनासे झाले आहे. तसेच कर्जमाफीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येऊ नये, असे निर्बंध बँकांना घालण्यात आले आहेत. शासनाने ‘आपले सरकार’वरील माहिती पूर्ववत करावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.बँकांना मिळालेली कर्जमाफीची रक्कमजिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकºयांनी आॅनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी २९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२७ शेतकºयांची २८७ कोटी ६ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे. यामध्ये अलहाबाद बँकेतील २ हजार ६ शेतकºयांसाठी १४ कोटी ५४ लाख, आंध्रा बँकेतील ६२ शेतकºयांसाठी २९ लाख, बँक आॅफ बडोदामधील ५६५ शेतकºयांसाठी ४ कोटी ३२ लाख, बँक आॅफ इंडियामधील २३३ शेतकºयांसाठी १ कोटी ३५ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र बँकेतील ५ हजार ५४२ शेतकºयांसाठी ३६ कोटी ८५ लाख, कॅनरा बँकेतील ६७४ शेतकºयांसाठी ४ कोटी १८ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३१६ शेतकºयांसाठी २ कोटी १८ लाख, देना बँकेतील १६६ शेतकºयांसाठी १ कोटी ११ लाख, आयडीबीआय बँकेतील २१७ शेतकºयांसाठी ३६ लाख, पंजाब नॅशनल बँकेतील ५२ शेतकºयांसाठी ३१ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियामधील ३० हजार १२३ शेतकºयांसाठी ८२ कोटी १७ लाख, सिंडीकेट बँकेतील २१६ शेतकºयांसाठी १ कोटी ५२ लाख, युको बँकेतील २ हजार ५५१ शेतकºयांसाठी ७ कोटी ४६ लाख, युनियन बँकेतील ६९८ शेतकºयांसाठी ५ कोटी १३ लाख, विजया बँकेतील १९३ शेतकºयांसाठी १ कोटी ५ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ६ हजार ३२ शेतकºयांसाठी १२ कोटी ८२ लाख तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील १५ हजार ६८१ शेतकºयांसाठी सर्वाधिक ११० कोटी ९७ लाख रुपयांच्या रक्कम बँकांना प्राप्त झाली आहे.