मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विक्रमी लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले होते. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आरोग्य विभागाला केंद्रनिहाय उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. त्यानुसार जिल्हाभरात ठिकाणी लसीकरण शिबिर राबवण्यात आले. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील १८९ केंद्रांवर १८ सप्टेंबर रोजी लसीकरण सत्र राबविण्यात आले. त्यात २१ हजार ३७४ नागरिकांनी लसीकरण केले आहे. जिल्ह्यात लसिकरनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाने देखील विविध ठिकाणी जनजागृती करून कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ ते १२ हजार नागरिकांचे दररोज लसीकरण होत होते. शनिवारी तब्बल २१ हजार ३७४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.