परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरेानाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारीही बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात जिल्ह्यात २१५ बाधितांची नोंद झाली. त्यामध्ये तब्बल १६५ रुग्ण परभणी शहर व तालुक्यातील आहेत. या शिवाय जिंतूर तालुक्यात २०, पालममध्ये ४, सेलू तालुक्यात ९, गंगाखेड तालुक्यात ३, मानवत, सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळला आहे. याशिवाय औरंगाबाद, जालना, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील रुग्णही परभणीत बाधित आढळले आहेत. शुक्रवारी ६५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार १५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ९ हजार ६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३४७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आरोग्य संस्थांमध्ये जिल्ह्यात सद्यस्थितीत ७४४ रुग्ण उपचार घेत आहेत.
परभणी जिल्ह्यात २१५ कोरोनाबाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:16 AM