उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती
या प्रकरणात चौकशी करण्यासाठी सेलू येथील उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केली आहे. सदरील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे. आता ही समिती कधी नियुक्त करण्यात आली, अहवाल कधी देणार, याची मात्र कुठल्याही प्रकारची माहिती नगरविकासमंत्र्यांनी दिलेली नाही.
पाणीपुरवठा योजनेचीही चौकशी
आ. मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर नगरपालिकेच्या ८० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतही अपहार झाल्याची तक्रार केली होती. त्यासंदर्भात नगरविकासमंत्री शिंदे यांनी माहिती दिली आहे. त्यामध्ये या योजनेतील अनियमिततेच्या अनुषंगाने शासनाकडे तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार सेलू येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यास देण्यात आली असून, चौकशीतील अभिप्रायाप्रमाणे कारवाई करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी दिल्याचे शिंदे म्हणाले.