शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून २००३ ते २०१० च्या कालावधीत प्लॉटचे नियमबाह्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 5:55 PM

जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अनेक संचालक व कर्मचार्‍यांनी लाखो रुपयांची उचल करुन अनेक प्लॉट नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा प्रकार लेखापरिक्षण अहवालात समोर आला असून यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हा विशेष लेखा परिक्षकांनी नोटिसा बजावल्या आहेत.

- विजय चोरडिया

परभणी : जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अनेक संचालक व कर्मचार्‍यांनी लाखो रुपयांची उचल करुन अनेक प्लॉट नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा प्रकार लेखापरिक्षण अहवालात समोर आला असून यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हा विशेष लेखा परिक्षकांनी नोटिसा बजावल्या आहेत.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २००३ ते २०१० या कालावधीतील लेखापरिक्षण अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषीशी निगडित असणार्‍या व्यावसायिकांनाच गाळे व प्लॉटचे वाटप करण्यात येते; परंतु, या संदर्भात कोणतेही नियम न पाळता मुकूंद बंडूसिंग चव्हाण यांना तीन प्लॉटचे वाटप नियमबाह्य पद्धतीने करण्यात आले. त्यांनी शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराशी कोणताही संबंध नसताना शाळेसाठी या भूखंडाचा वापर केला. तर समर्थ वेद विद्यालय ढालेगाव यांनाही अकृषिक कामासाठी भूखंड देण्यात आला. या सर्व बाबीला विद्यमान संचालक मंडळ व सचिव यांना जबाबदार धरण्यात आले आहे. याशिवाय खरेदी-विक्री संघ जिंतूरच्या आवसायकांनी आपल्या ताब्यातील प्लॉट परस्पर किसनमल दरगड, जगदीश दरगड, सत्यनारायण दरगड यांच्या नावे वाटप केले. ही वाटप प्रक्रिया नियमबाह्य ठरविण्यात आली आहे.

बाजार समितीचे संचालक रामचंद्र देशमुख यांनी २७ नोव्हेंबर २००७ रोजी डेड स्टॉक खरेदीसाठी १ लाख रुपयांची उचल केली होती. यासंदर्भात त्यांनी या रक्कमेचा डेड स्टॉक खरेदी न करता ही रक्कम स्वत:च वापरली. त्यामुळे तत्कालीन संचालक रामचंद्र देशमुख यांना जबाबदार धरण्यात आले आहे. लेखापरिक्षणामध्ये ५२ व्यक्ती व प्रतिष्ठान, संस्था यांना प्लॉट व भूखंड व्यतिरिक्त जागा वाटप हस्तांतरण करण्यात आले. हस्तांतरणाचे कोणतेही ठोस कारण देण्यात आले नाही. १३ व्यक्तींना वारसा हक्काने प्लॉट वाटप करण्यात आले; परंतु, चार जणांकडे बाजार समितीचे परवाने नाहीत. शिवाय पंचफुला ठोके, अ.माबुद मकसूद, अकबरोद्दीन सिद्दीकी, मन्नाबी शेख हकीम, गौरव काळे यांच्याकडेही बाजार समितीचा कोणताही परवाना नाही. त्यांना भूखंड देण्यात आले. हे नियमबाह्य भूखंड तत्कालीन संचालक व सचिवांनी वाटप केले आहेत. 

संचालक मंडळाकडे प्रवास भत्यापोटी १ लाख ५० हजार ५३६ रुपये येणे बाकी आहे. यात विनायक आडे यांच्याकडे ३७ हजार ८८०, आनंदराव घुगे यांच्याकडे ४२ हजार ३२५, प्रकाश पवार यांच्याकडे २१ हजार ५० असे १ लाख १५५ रुपये असून अद्यापही त्यांनी पैसे भरलेले नाहीत. शिवाय अग्रीम म्हणून संचालकांनी अनेक रक्कमा उचलल्या. त्यात स.अस्मान ५ हजार रुपये, दत्तराव गिते ९ हजार रुपये, विनायक आडे ६७ हजार ९००, बापुराव गायकवाड ३२ हजार ७००, आनंदराव घुगे ३५ हजार व सुवर्णा पवार ५ हजार रुपये असे १ लाख ५४ हजार ६०० रुपये अग्रीम संचालकांनी उचलले. पण त्याचा हिशोब दिला नाही. संचालकांप्रमाणे कर्मचार्‍यांनीही ३ लाख ३७ हजार ९९१ रुपये अग्रीम उचल केली होती.  त्यापैकी आर.एस. गाडेकर यांच्याकडे ५४ हजार ८१७ रुपये अद्यापही बाकी आहे. तर प्रवास खर्चासाठी कर्मचार्‍यांनी १ लाख ७३ हजार २४० रुपये उचलले होते. पैकी तत्कालीन सचिव ग.रा.मेडेवार यांनी १० हजार ४००, एस.एल. महाजन यांनी ७६ हजार ७३७ रुपये अद्यापही भरणा न केल्याने बाजार समितीचे मोठे नुकसान झाले आहे.  तसेच या सर्व प्रकरणात तत्कालीन २८ संचालक व तत्कालीन तीन सचिवांना जबाबदार धरण्यात आले आहे़ 

९ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणीया संदर्भात संबंधित संचालक, सचिव, मालमत्ताधारक यांना जिल्हा विशेष लेखापरिक्षक एस.आर. कांबळे यांनी नोटिसा बजावल्या असून १५ दिवसांच्या आत खुलासा सादर करावा तसेच ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत सुनावणीसाठी हजर रहावे, असे आदेशित केले आहे.तसेच बाजार समितीमध्ये अनेकांनी निवासी बांधकाम केले आहे. जे की बाजार समिती नियमाला धरुन नाही. यात वैदीक पाठशाळा, तानाबाई घनसावंत, मन्नाबी शेख हकीम,  दुर्गादेवी अग्रवाल, स्वाती काळे, गौरव काळे, प्रिती अग्रवाल यांच्या बांधकामासंदर्भात गंभीर आक्षेप जिल्हा उपनिबंधकांनी नोंदविले आहेत. 

२८ संचालक; ३ सचिव जबाबदार या सर्व प्रकरणात तत्कालीन २८ संचालक व तत्कालीन ३ सचिवांना जबाबदार धरण्यात आले असून याबाबत त्यांच्याकडून वसुली का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या संचालकांना व सचिवांना चांगलाच धक्का बसला आहे. 

नोटिसा बजावण्यात आल्या आहेत बाजार समितीतील गाळे व प्लॉटच्या संदर्भात संबंधीतांना नोटिसा बजावण्यात आल्या असून ९ फेब्रुवारी रोजी या संदर्भात सुनावणी ठेवण्यात आली आहे़ नोटिसीच्या उत्तरानंतरच पुढील कारवाईची दिशा निश्चित करण्यात येईल.- सेवादास कांबळे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक

टॅग्स :parabhaniपरभणी