परभणी- येथील तहसील कार्यालया अंतर्गत निलंबित करण्यात आलेले २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सेवेत पुनरस्थापित केले आहे़
परभणी येथील मंडळ अधिकारी पी़आऱ लाखकर यांना जमीन फेरफार प्रकरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी तर तलाठी लक्ष्मीकांत काजे यांना उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे यांनी जानेवारीच्या प्रारंभी निलंबित केले होते़ जिल्हाधिकाऱ्यांच्या गाव भेटी दरम्यान, गैरहजर असल्याबद्दल व तलाठ्यांचे दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात न ठेवल्याबद्दल मांडवा येथी तलाठी आयशा हुमेरा यांनाही उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे यांनी निलंबित केले होते़ या प्रकरणात तलाठ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात आंदोलनही केले होते़ नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
निलंबनाच्या २२ दिवसांतच तिन्ही कर्मचारी पुन्हा एकदा सेवेत पुनरस्थापित झाले आहेत़ तलाठी काजे आणि आयशा हुमेरा यांचे निलंबन १९ जानेवारी रोजी मागे घेवून त्यांना पुनरसेवेत स्थापित केल्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्यानुसार काजे यांना मांडवा येथील सज्जा देण्यात आला असून, आयशा हुमेरा यांना आर्वी येथे नियुक्ती देण्यात आली आहे़ २२ जानेवारी रोजी मंडळ अधिकारी लाखकर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत पुनरस्थापित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत़ त्यामध्ये लाखकर यांना जिंतूर तालुक्यातील बामणी मंडळात नियुक्ती देण्यात आली आहे़